आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शनाला जाताना कॅरिबॅग वापरू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संतांच्या पालखी दर्शनासाठी मंदिरात जाताना प्लास्टिक कॅरिबॅगमध्ये पूजेचे साहित्य नेण्याएेवजी फक्त कापडी पिशव्यांचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी स्वत:पासून त्याचे अनुकरण करण्याबरोबर पालखी मार्गावरील वारकऱ्यांना प्लास्टिक थर्माकोल वापरापासून परावृत्त करावे, असे आवाहन पर्यावरणाचे अभ्यासक प्रशांत अवचट यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत थं क्रिएटिव्ह तर्फे पर्यावरण दक्षता कृती मंचतर्फे आयोजिलेल्या ‘प्लास्टिक कचरा मुक्त दिंडी अभियान’ कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अण्णा ताम्हणकर, स्वर्णलता भिशीकर, यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते.

अवचट म्हणाले, ‘पालखी मार्गावर जेवणाऱ्या पंक्तीसाठी थर्माकोल प्लास्टिकच्या पत्रावळींचा वापर होतो. पण, त्यांचे तोटे पर्यावरणास होणारा धोका याबाबत वारकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यात येत आहे. पालक विद्यार्थ्यांनी त्या मोहिमेत सहभागी व्हावे. वारकऱ्यांची दिंडी प्रमुखांची माहिती एकत्रित करून त्यांना प्लास्टिक थर्माकोलपासून परावृत्त करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्याचे नियोजन सुरू आहे.’

प्लास्टिक कचरामुक्त वारीसाठी प्रयत्न
देवळात किंवा पालखीच्या दर्शनासाठी जाताना पान-फुल प्रसादाचे साहित्य कॅरिबॅगमध्ये ठेवण्यात येते. कॅरिबॅग घेऊच नये, यासाठी ठोस कृती धोरण राबविण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. पुढील चार वर्षामध्येे दोन्ही पालखी मार्ग प्लास्टिक थर्माकोल पत्रावळी कचऱ्यापासून मुक्त करण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...