आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडा शिवार सारं, वाडवडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- वाडाशिवार सारं, वाडवडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण, मन मोहरून जाई, तुझ्या अपार कष्टाने, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेनं, होऊ कसा उतराई अशी ऋणात्मक भावना व्यक्त करत सोमवारी (दि. २१) अकलूज, महाळूंग, माळीनगर परिसरात श्रावणी बैल पोळा उत्साहात साजरा झाला. 

रविवारी खांदेमळणी झाल्यानंतर सोमवारी सर्व शेतकरी बांधवांनी आपले बैल सजवले. दुपारनंतर बैलांच्या मिरवणुका काढून त्यांना महाबली हनुमंताच्या मंदिरात नेऊन दर्शन दिले. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलजोडीची ओवाळणी करण्यात आली. चाऊर..चाऊर..चांगभलं.., येऊ द्या पाऊस होईल भलं... अशी आरोळी देत पेरणीचे साहित्य चाडे-नळ्यांची पूजा करण्यात आली. अकलूज येथे दरवर्षीप्रमाणे दिसणाऱ्या बैलजोडींच्या मिरवणुका फारशा दिसल्या नाहीत. 

माळीनगर-महाळूंग येथे मोठ्या थाटात मिरवणुका निघाल्या. गुलालाची उधळण करत हलगीच्या तलावार बैलजोडी मंदिरापर्यंत नेण्यात आल्या. अनेक बैलांवर मराठा मोर्चातील घोषवाक्ये लिहिण्यात आली होती. बैलांसह शेतकरी बांधवांनी आपल्या गोठ्यातील गाई, म्हशी, शेळ्या आदी जनावरे सजवून त्यांचीही पूजा केली. पोळ्याच्या आधी दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण होते. 

महाळूंगमध्ये साधेपणाने पोळा झाला साजरा 
महाळूंग गट क्रमांक दोन येथील बैलपोळा दरवर्षी कुतुहलाचा विषय असतो. बैलजोडीच्या आधारावर उदरनिर्वाह करणारा वर्ग येथे मोठा आहे. येथील मिरवणुकांसमोर नर्तिका नाचवल्या जातात. यंदा काही बैलमजुरांच्या घरी निधनाच्या घटना घडल्याने येथील पोळा साधेपणाने झाला. 
बातम्या आणखी आहेत...