आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या 27 वर्षीय गर्भवती महिलेसोबत ते करणार होते असे काही; पोलिसांनी घेतले 8 जणांना ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
सोलापूर/टेभूर्णी- रांझणी देवाची (ता. माढा) येथे बीड जिल्ह्यातील एका 27 वर्षाच्या गरोदर असलेल्या महिलेच्या पोटावर मुलगा की मुलगा याची गर्भलिंग निदान मशिनद्वारे तपासणी करत असताना पोलिसांनी छापा टाकून त्या महिलेसह आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी फरार असून 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष गायकवाड यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील एक दलाल आरोपी फरार झाला. ही घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली.
 
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, रांझणी देवाची (ता. माढा) येथे दलाला मार्फत बीड जिल्ह्यातील 27 वर्षीय महिलेवर मशिनद्वारे गर्भलिंग निदान केले जाणार असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीसांना मिळाली होती. येथील विकास विश्वनाथ चव्हाण याचा घरात बीड येथील महिलेवर गर्भलिंग मशिनद्वारे तपासणी करत असताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी घर मालक विकास चव्हाण, डॉ. संतोष निंबाळकर त्याचा सहकारी गजानन आण्णासो कुंभार (दोघे रा. राजळे ता. फलटण जि. सातारा), दुसरा दलाल शिवाजी किसन देशमुख (रा. कन्हेर इस्लामपूर ता. माळशिरस), महिलेचा पती सुरेश पोथीराम शेळके (वय 33, महिलेची आत्या छटकाबाई मारूती सावंत, कार चालक राजू तुकाराम लोखंडे (सर्व रा. पिंपरी घाटा ता. आष्टी जि. बीड) अशा 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
दलाल फरार
यातील दलाल अमर जाधव (रा. रांझणी ता. माढा)  हा आरोपी फरार झाला. या गुन्ह्यातील 4 लाख रूपये किमतीची गर्भलिंग तपासणी मशिन व ओमनी कार (क्र. एम. एच. 16 ऐ. बी. 893) सह 5 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. वरील 8 जणांच्या विरोधात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी फिर्याद दिली असून तपास पोलिस निरीक्षक आनंद खोबरे करत आहेत.
 
चाचणी करण्यासाठी 12 हजार रूपये
फलटण येथील डॉ. संतोष निंबाळकर हा माळशिरस तालुक्यातील शिवाजी किसन जाधव व माढा तालुक्यातील अमर किसन जाधव या दलाला मार्फत गर्भलिंग निदान करण्यासाठी येत होता. एक चाचणी करण्यासाठी 12 हजार रूपये तो संबंधित व्यक्तीकडून घेत असे. हा डॉक्टर सापडल्यामुळे टेंभुर्णी परिसरात गर्भलिंग निदान होत असल्याचे स्पष्ट झाले. अकलूज येथील घटना घडल्यानंतर 8 दिवसात दुसरी घटना उघडकिस आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. किती जणांचे गर्भलिंग निदान केले आहे. हे पोलिस तपासानंतर उघडकीस येणार आहे.                        
बातम्या आणखी आहेत...