आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे मिळवून देतो म्हणून दागिने पळवणारा पोलिसांच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ज्येष्ठ महिलांना गाठून पेन्शन, निराधार योजनेतून पैसे मिळवून देण्याची लालूच दाखवत त्यांच्याकडील दागिने, पैसे, मोबाइल घेऊन पोबारा करणारा ठग पोलिसांच्या जाळ्यात सापडला अाहे. सुमारे सोळा गुन्हे फौजदार चावडी पोलिसांनी उघडकीस अाणले. सचिन अाणप्पा गायकवाड (वय ३५, रा. मुकुंदनगर, न्यू बुधवारपेठ) याच्याकडून दहा तोळे दागिने जप्त करण्यात अाले.
दागिने, पैसे, मोबाइल हातात घेऊन साहेबांना पैसे देतो, म्हणून मोबाइलवर बोलत जाण्याचा बहाणा करून पळून जायचा. ज्यांची फसवणूक झाली, त्या सर्व महिला गृहिणी काही वयस्कर अाहेत. घरेलू काम, घरकाम करणाऱ्या महिलांचीही गायकवाडने फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशीहोती गुन्ह्याची पद्धत
सेतू परिसरात तो थांबायचा. दाखले काढण्यासाठी अाल्यानंतर मदत मिळवून देण्याचे अामिष दाखवून त्यांना लोकांची वर्दळ नसलेल्या भागात बोलावून साहेबांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून दागिने, काही पैसे, मोबाइल घेऊन जात. याशिवाय निराधार योजनेतून पैसे मिळवून देतो, एलअायसीमध्ये कामाला लावतो, अशी थाप मारून गायकवाड हा महिलांची फसवणूक करीत होता.

पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, सहा. अायुक्त सुभाष नेवे, निरीक्षक विजय साळुंखे, इक्बाल सय्यद, फौजदार शैलेश खेडकर, फुलचंद जाधवर, राजकुमार तोळणुरे, प्रतुल सुरवसे, शिव लोहार, सचिन हार, योगेश सावंत, सागर मेटकुळे, दिलीप विधाते, शीतल शिवशरण, राम जाधव, कृष्णात कोळी, मनोज राठोड, कैलास खटके, विनोद रजपूत, राजू मुदगल, अमोल यादव यांच्या पथकाने कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...