आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ५३ पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट; रिक्त पदांनाही न्याय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - तीन महिन्यांपासून बहुचर्चित पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर शनिवारी (दि.८) अर्धगुरुपौर्णिमेला मुहूर्त लाभला आहे. यामध्ये लोहारा, आनंदनगर स्थानिक गुन्हे शाखा या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी देण्यात आले अाहेत. महत्त्वाच्या असलेल्या उमरगा, उस्मानाबाद शहर, तुळजापूर, कळंब येथे अनुक्रमे गुंडीले, नेवसे, बाबर बोरीगिड्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्यावर संपूर्ण जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांचे लक्ष असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी उस्मानाबाद शहरचे निरीक्षक दगडुभाई शेख यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. 
 
उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची गेल्या तीन महिन्यांपासून चर्चा सुरू होती. परंतु, विविध कारणास्तव या बदल्या लांबत गेल्या. त्यातच वर्षभरापासून जवळपास २० हून अधिक अधिकारी पोलिस नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत होते. एकीकडे पोलिस ठाणे स्तरावर अधिकाऱ्यांची कमतरता आणि दुसरीकडे मुख्यालयात अधिकाऱ्यांचा भरणा अशी विरोधाभासी स्थिती गेल्या वर्षभरापासून जिल्हा पोलिस दलात दिसून येत होती. त्यातच जून महिना संपला तरी बदल्याबाबत कोणतेच आदेश निघत नसल्याने अधांतरी असलेल्या अधिकाऱ्यांनाही मुलांचे शिक्षण, नवीन जागी जायची वेळ आली तर तेथील नियोजन अशा एक ना अनेक अडचणींनी ग्रासले हाेते. त्यातच गत महिन्यात पोलिस अधीक्षक जवळपास पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ सुटीवर गेल्याने या बदल्या आणखी रेंगाळल्या. मात्र, अर्ध गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत पोलिस उपाधीक्षक गृह गोपिका जहागिरदार यांनी पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून जिल्ह्यातील ५३ पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार संबंधितांना आदेश देण्यात आले असून तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील२४ सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या : प्रथम१६ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांनंतर २४ सहाय्यक १३ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश निघाले. एपीआयमध्ये नियंत्रण कक्षातील पी.डी.भातनाते यांची एटीसी, बी. टी. चौधरी- आर्थिक गुन्हे शाखा, पी. ए. पोवार- वाचक एसडीपीओ तुळजापूर, एम.एस.सानप-महिला सुरक्षा विभाग, एम.आय.शेख-मुरूम, एन.जी.मिरकर- तामलवाडी, जी. बी.पालवे- मंदिर सुरक्षा, तुळजापूर, डी.एन. सुरवसे- बीडीडीएस, एम.ए. सय्यद-भूम, ए. ए. चौरे यांची वाहतूक शाखेत बदली झाली. मुरूम येथील व्ही.व्ही.गोबाडे-जिविशा, एलसीबीतील एस.बी.तांबे- त्याच शाखेत, महिला तक्रार निवारण, आनंदनगरच्या व्ही. बी.कदम यांची सायबर सेल, वाहतूक शाखेचे पी.बी.पाटील यांची परंडा, लोहाराचे प्रभारी एफ.सी.मेंगडे यांची अपर अधीक्षकांचे वाचक, आनंदनगर ठाण्याचे प्रभारी डी.बी.शिंदे यांची नियंत्रण कक्षात, तामलवाडीचे प्रभारी वाहब बेग यांची भूम कोर्ट, बेंबळीच्या के.डी.दांडगे यांची उमरगा कोर्ट, बीडीडीएसचे एस.डी.पठाण यांची नियंत्रण कक्ष, तुळजापूरचे एस. जी. दासरवाड, आनंदनगर, एस. एल. बाचकेंची तुळजापूर, एटीसीचे सूर्यवंशी-नळदुर्ग,विशेष शाखेतील बी.एन. हातमोडे यांची बेंबळी येथे बदली झाली आहे. 

बदल्यांच्या आदेशाने ‘कही खुशी कही गम’ 
सगळ्यात शेवटी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही ठिकाणी खांदेपालट तर काहींना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. 
अधिकाऱ्याचे नाव सध्या नवीन नियुक्ती 
एस.एस.बाबर नियंत्रण कक्ष तुळजापूर 
आर.आर.मोर नियंत्रण कक्ष मंदिर सुरक्षा, तुळजापूर 
एम.बी.सूर्यवंशी नियंत्रण कक्ष भूम 
डी.एस. बोरीगिड्डे नियंत्रण कक्ष कळंब 
एस.ए.भंडारे नियंत्रण कक्ष लोहारा 
डी. एम. शेख उस्मानाबाद शहर एलसीबी 
डी.एस.डंबाळे परंडा वाशी 
एस.व्ही.नेवस कळंब उस्मानाबाद शहर 
एम.डी.गुंडीले नियंत्रण कक्ष उमरगा 
एस.एस.सय्यद वाशी आनंदनगर, उस्मानाबाद 
आर.एम.मोताळे नियंत्रण कक्ष परंडा 
एच.एन.खाडे भूम पोलिस कल्याण 
आर.एस.बोकडे तुळजापूर नियंत्रण कक्ष 
बातम्या आणखी आहेत...