आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता दुभाजकाला दुचाकी धडकून फौजदाराचा मृत्यू, ड्युटीवरून घरी जाताना अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ड्युटीसंपवून घरी जाताना अंत्रोळीकर नगरातील रस्ता दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात फौजदार पंकज भारत सातपुते (वय ३०, रा. पाटकूल, मोहोळ, हल्ली - मंगलविहार काॅम्प्लेक्स, नवीन अायएमएस शाळेजवळ, जुळे सोलापूर) यांचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी अपघात रविवारी पहाटे दीडला घडला. अपघातानंतर काही काळ ते जागीच पडून होते. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकाने ही घटना पाहून उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर मरण पावल्याचे सांगण्यात अाले. 

ते सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फौजदार होते. एक वर्षापूर्वीच त्यांचा जया यांच्यासोबत विवाह झाला होता. पत्नीही मुंबईत वडाळा येथील ठाण्यात फौजदार अाहेत. २८ दिवसांपूर्वीच त्यांना मुलगा झाला अाहे. 

पत्नी जया यांना दु:ख अावरत नव्हते : पहाटेदोन-अडीचच्या सुमाराला अोळखपत्रावरून घरी माहिती देण्यात अाली. शासकीय रुग्णालयात पत्नी जया नातेवाईक अाले. पतीची अवस्था बघून त्यांना दु:ख अावरत नव्हते. उपस्थित पोलिसांनाही गहिवरून अाले होते. २८ दिवसांचे बाळ, पतीबाबत घडलेला दुर्दैवी प्रकार, वर्षापूर्वीच विवाह झाला होता. अाता कुठे सुखी संसार सुरू झाला होता. पोलिस दलात हळहळ व्यक्त होत अाहे. दुपारी मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर मूळगावी पाटकूलला नेण्यात अाले. तिथेच अंत्यसंस्कार करण्यात अाले. त्यांच्या मागे अाई, वडील, पत्नी, बहीण, भाऊ असा परिवार अाहे. 
 
पंकज हे २०१२-१३ बॅचचे फौजदार अाहेत. वर्षाचे प्रशिक्षण संपवून गोंदिया येथे कामावर होते. तिथून दोन महिन्यांपूर्वीच बदलून ग्रामीण पोलिस ठाण्यात अाले होते. सोलापूर तालुका पोलिसात नेमणुकीस होते. दीडच्या सुमाराला कामावरून घरी जाताना त्यांची दुचाकी डाॅ. देशपांडे यांच्या घरासमोरील दुभाजकाला धडकली. पाऊस पडत होता. अपघानंतर गाडी बाजूलाच पडली होती. बेशुद्ध अवस्थेत विजापूर नाका पोलिसांनी उपचाराला दाखल केल्यानंतर मरण पावल्याचे सांगण्यात अाले. नाईक दगडू राठोड तपास करीत अाहेत. 
 
कासेगाव अौटपोस्टची जबाबदारी
पंकजयांच्यावर कासेगाव अौटपोस्टची जबाबदारी होती. अपघातानंतर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी रुग्णालयास भेट दिली. तातडीने काही शासकीय मदत देण्यासाठी सूचना दिल्याचे सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले. ते धाडसी अभ्यासू फौजदार होते. जूनमध्ये ते बदलून अाले होते. यापूर्वी नाशिक, मुंबई, गोंदिया या भागात काम केले अाहे. दलात येऊन ७-८ वर्षे झाल्याचे श्री. नावंदे म्हणाले. पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी सकाळी फौजदार जया यांची भेट घेऊन सांत्वन केले. उपअधीक्षक अभय डोंगरे यांनीही भेट घेतली. मंगल िवहार येथील घरी शासकीय रुग्णालयात पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची गर्दी झाली होती. 
बातम्या आणखी आहेत...