आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कुटुंबीयांच्या स्वयंपूर्णतेसाठी पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिसांच्या कुटुंबीयांनीही प्रगती करावी, त्यांच्या पत्नी वा भगिनींनी आर्थिकदृृष्ट्या सक्षम व्हावेे म्हणून सोलापूरच्या ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू त्यांची पत्नी प्रिया प्रभू यांनी पोलिस वेल्फेअरच्या खर्चातून चक्क मोफत व्यावसायिक ब्यूटीपार्लर कोर्स सुुरू केला आहे. महिन्याच्या कोर्ससाठी ९० महिलांनी सहभाग घेतला आहे.

पोलिस कुटुंबातील महिलांना स्वयंपूर्ण करावे आणि त्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी काही तरी करावे, असे मनात होते. त्यातून ब्यूटीपार्लर कोर्स सुरू करण्याची कल्पना सुचली, असे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले.
प्रिया प्रभू, सहायक अधीक्षक मनीषा दुबुले, सपोनि विठ्ठल भालेराव, शुभांगी डोळ्ळे यांच्या पुढाकारातून १५ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अाशा सोमाणी, प्रशिक्षक
पोलिस म्हणूनकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटंुबीयांसाठी इतक्या बारकाव्याने विचार केला जातो शीतल कदम, प्रशिक्षणार्थी
महिला प्रगतीसाठी
पती कोणत्याही हुद्यावर असले तरी घरातील महिलांनी स्वत: सक्षम स्वयंपूर्ण व्हावे. माझी पत्नी प्रिया ही याच विचारांची आहे.तिच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला. वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक
बातम्या आणखी आहेत...