आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

192 पोलिसांनी निधी जमवून अनाथाश्रम, पाखर संकुलात केली मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर ग्रामीण पोलिस दलात २००७ मध्ये १९२ तरुण भरती झाले. अाज त्यांच्या सेवेला १० वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल ‘वर्दीतली माणुसकी’ हा वेगळा उपक्रम घेतला. सेवा काळात दोन मित्रांचे निधन झाले. त्यांच्या मुलांसाठी प्रत्येकी ५१ हजार याप्रमाणे एक लाखाची बँकेत ठेव ठेवली. पंढरपूर माढा येथील वृध्दाश्रम अनाथाश्रम शहरातील पाखर संकुलात चादरी फ्रीज अन्य साहित्य भेट दिले. अाई, वडील, पत्नी, मुले, पोलिस अधिकारी यांच्यासोबत स्नेहमिलन. स्नेहभोजन रक्तदान शिबिर झाले. रविवारी ग्रामीण पोलिस मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात पोलिस अधीक्षक, अन्य अधिकारी कर्मचारी यांच्यातील प्रोटोकाॅलही बाजूला सारून सगळेजण एकोप्याने यात सहभागी झाले. राज्यातील पोलिस दलात असा उपक्रम पहिल्यांदाच झाल्याचा दावा अाहे. 

तत्कालीन पोलिस अधीक्षक अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात ही भरती झाली होती. त्यांनाही अामंत्रित करण्यात अाले होते. कामामुळे ते अाल्यामुळे शुभेच्छा पत्र मुंबईहून पाठविले होते. त्याचे वाचन झाले. यावेळी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक निखील पिंगळे एन. एम. अत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. असा उपक्रम पहिल्यांदा पाहतोय. सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम मनाला भावला, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा, सेवेत प्रामाणिक मनापासून काम करा. यापुढेही उत्तुंग कामगिरीचा अालेख उंचावत ठेवा, असे मत श्री. प्रभू यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्दे... 
- १९२ पोलिसांचा व्हाॅटस्अॅप ग्रुप, प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी 
- सगळ्यांचे वाढदिवस साजरे होतात, याच संवादातून हा सोहळा 
- रामदास कदम क्रांती पाटील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुलांच्या नावे ५१ हजाराची बँकेत एफडी 
- हवालदार पांडुरंग चटके अाजारी असल्यामुळे त्यांनाही अार्थिक मदत 
- प्रशिक्षण देणारे उत्तम घोलप, अार. डी. शिंदे, जालिंदर दळवी, जगदीश कोरशेट्टी, गंगू कवचाळे, सौ. कवचाळे, शिवानंद म्हेत्रे या गुरूजनांचा सत्कार 
- सहकारी मित्र राहुल गोंधे पीएसअाय झाल्याबद्दल, अमोल यादव अनिल शिंदेंच्या चांगल्या कामाबद्दल सत्कार 
- या सहकाऱ्यांनी केले होते नियोजन - सुहास नारायणकर, लक्ष्मण कोळेकर, गणेश शिंदे, तौफिक दिंडूरे अादी. 
- अभिजित गाटे यांनी काळ बदलला तर धनराज शिंदे यांनी अाई मला माफ कर ही कविता सादर केली. 
- अभिजित मुळे यांनी एसपी प्रभू यांच्यावर सिंघम, रावडी राठोड, चुलबुल पांडे अशी बिरूदावली देत कविता सादर केली. 
बातम्या आणखी आहेत...