आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीच्या आरडाओरडीमुळे जीव वाचला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : अरविंदधामयेथे राहणारे पोलिस कर्मचारी अनिल पवार यांनी शुक्रवारी राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने वेळीच आरडाओरड केल्यामुळे शेजारील लोकांनी त्यांना तत्काळ खाली उतरवून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

विवाहितेचा छळ, पाच जणांविरुद्ध गुन्हा
विवाहितेचाछळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पती अर्शदहुसेन इम्तियाज इनामदार, साबिरा इम्तियाज जमादार, इम्तियाज इनामदार, शाहिना इनामदार, शिरीन इनामदार (लोखंडवाला कॉम्पलेक्स, सिद्धेश्वर पेठ) अशी त्यांची नावे आहेत. विवाहिता मरियम इनामदार यांनी फिर्याद दिली. अर्शदहुसेन इनामदार यांच्याशी १६ फेब्रुवारी २०१५ रोजी लग्न झाले. हा प्रकार मार्च २०१५ ते २६ ऑक्टोबर २०१५ दरम्यान घडला. माहेरवरून पुणे येथे घर घेण्यासाठी ४५ लाख रुपये आण, कारसाठी पैसे आण, तुझ्यामुळे नोकरी गेली, त्यामुळे दरमहा २५ हजार रुपये घेऊन ये, तुला मूल होत नाही असे म्हणून वेळोवेळी शारीरिक मानसिक छळ केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. जेलरोड पोलिस ठाण्यात नोंद आहे.

कारच्याधडकेत पार्क चौकात एकजण जखमी
पार्कचौकातून मोटारसायकलवरून जाताना मागून आलेल्या कारने धडक दिली. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रमाकांत लक्ष्मण शिवशरण (वय २९, रा. विश्वनगर, विजापूर रोड) हा दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या कार(एमएमच १३, एन ११४८) ने धडक दिली. यामध्ये रमाकांत जखमी झाला. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणकरून पैसे हिसकावले
केगावपुलाजवळ कार मालकाने ट्रकचालकास मारहाण करून त्याच्याकडील पैसे काढून घेतले. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश श्रीरंग गोसावी (वय ३४, रा. वेणेगांव, माढा) हा ट्रक (एमएच १२, एटी ४२५५) घेऊन जात होता. तेवढ्यात (एमएच १३, बीसी ६७०३) ही कार ट्रकच्या समोर उभी करण्यात आली. कारचालकाने ट्रकचालकास शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून ट्रकच्या केबीनमधील तीन हजार रुपये पैशाचे पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. तसेच काचेवर दगड मारून दोन हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबत कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४७ हजारांचा ऐवज लंपास
राजस्वनगरयेथे बाळू नीळू चव्हाण यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने घरातील ४७,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत चव्हाण यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे. यावरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॅनच्याधडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
सोरेगावरोड येथून मोटारसायकवरून येताना व्हॅनने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. श्रीशैल टोणे असे मृताचे नाव आहे. श्रीशैल धर्मण्णा टोणे हा मोटारसायकलवरून जाताना व्हॅन (एमएच २६, सी २२४९) ने ओव्हरटेक करताना दुचाकीस धडक दिली. यात दुचाकीस्वार श्रीशैल हा गंभीर जखमी झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याबाबत सिध्दाराम धर्मण्णा टोणे (वय २४, रा. गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर २) याने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून व्हॅनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंधरा हजार पळवले
सुराणामार्केट रोडवर ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी एका व्यक्तीने पंधरा हजार रुपये ठेवलेली पिशवी लंपास करण्यात आली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व्यंकटेश पंडितराव देशपांडे (वय ६५, रा. जुनी मिल लाइन) हे आपली स्कूटर थांबवून शर्टवर पडलेली घाण पुसत होते. तेवढ्यात अज्ञात चोराने त्यांच्याकडील कापडी पिशवी लंपास केली. या पिशवीत पंधरा हजार रुपये होते. याबाबत त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
बातम्या आणखी आहेत...