आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनवेळा हवेत फैरी झाडून ९० पोलिसांनी दिली मानवंदना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिस स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पोलिस मुख्यालयातील स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर अाणि जिल्हा पोलिस अधीक्षक सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत चीनच्या सीमेवर २१ ऑक्टोबर १९५९ रोजी कर्तव्य बजावत असताना काही पोलिस शहिद झाले. म्हणून हा दिवस "शहीद पोलिस दिन' म्हणून साजरा केला जातो. बुधवारी सकाळी आठ वाजता पोलिस मुख्यालयातील स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१५ याा दरम्यान ४३९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यांच्या नावांचे वाचन पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घागरे वालावलकर आणि पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी केले. श्री सेनगावकर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शहीद दिनाचे महत्व विशद केले. पोलिस उप अधिक्षक विशाल नेहूल यांच्या नेतृत्वाखाली ९० पोलिसांनी हवेत तीनवेळा फैरी झाडून तसेच बॅँन्ड पथकाने मानवंदना दिली. यावेळी पोलिस उपायुक्त अश्विनी सानप, पोलिस उपायुक्त बालसिंह रजपूत, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक दिलीप कोल्हे, बाबा मिस्त्री, चेतन नरोटे, राजू हुंडेकरी, वुमन्स महाविद्यालयाचे प्राध्यापक गुलाम अहमद शेख यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांनी हवेत तीनवेळा फैरी झाडून मानवंदना दिली. दुसऱ्या छायाचित्रात पालकमंत्री देशमुख, पोलिस आयुक्त सेनगावकर यांनी पोलिस मुख्यालयातील स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले.

महाराष्ट्रातील १० शहीद पोलिस
विलास वाघेश्वर जोशी, शशिकांत निवृत्ती राऊत, उल्हास अनंत मयेकर, रवींद्र तुकाराम मानकर, अविनाश तुकाराम ढोले, डोगे डाेले अत्राम, अजय प्रभाकर गावंड, दीपक कोलते, चेतन विनायक साळवे, स्वरूप अशोक अमृतकर हे १० शहीद पोलिस महाराष्ट्रातील आहेत.