आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी पोलिसांनी काढली सुरक्षा रॅली, दुसरीकडे उपाययोजना न केल्याने गेला बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : गेल्या पाच वर्षात सुमारे २५ जणांचा बळी घेणाऱ्या हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्ड येथे बुधवारी अाणखी एक बळी गेला. बुर्ला महाविद्यायात बारावीत शिकणाऱ्या शिल्पा दत्तुण्णा टिकंदर (वय १७) हिचा ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला. पुण्याकडून अालेली वाहने हैदराबाद रोडकडे किंवा उलट दिशेने वळताना नेमके त्याच ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने, गाड्यांचे अतिक्रमण अाहे. त्यामुळेच हा अपघात झाला. सकाळी सुरक्षा दौड काढणाऱ्या पोलिसांनी या परिसरात उपाययोजना केल्यानेच संध्याकाळी एका बळीची अपघाती नोंद पोलिसांना करावी लागली. 
 
मार्केट यार्डसमोरील चौकात अपघात मालिका सुरूच आहे. २४ तासांत दुसरा अपघात झाला. पुन्हा त्याच ठिकाणी बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला. सायंकाळी ट्यूशन संपल्यानंतर शिल्पा सायकलवरून घराकडे जात होती. मार्केट यार्ड गेटसमोरील चौकातच पाठीमागून भरधाव वेगाने पुणे हायवेकडे वळण घेणाऱ्या ट्रकने तिच्या सायकलीला ठोकरले. सायकलसह ती ट्रकच्या चाकांमध्ये चिरडली. बघ्यांची गर्दी जमल्यानंतर तेथील वाहतूक पोलिसांचे लक्ष अपघाताकडे गेले तब्बल अर्ध्या तासाने पोलिस घटनास्थळी आले पंचनाम्याचे सोपस्कार सुरू केले. 
 
२४ तासात तिसरा बळी गेल्याने अपघातानंतर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्ता रोको केला. चौकात ठिय्या मारला. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले,सहाय्यक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर दोन तासानंतरही नागरिक रस्त्यावरून हटत नसल्याने अखेर वाद घालणाऱ्या दोन युवकांना पोलिसांच्या गाडीत नेऊन बसवले. सौम्य लाठी चालवली. त्यानंतर गर्दी पांगली जड वाहतूक सुरू होऊ शकली. 
 
भावाचा आक्रोश : अपघातग्रस्तमुलीकडे असलेल्या आयकार्डवरून तिचे नाव समजले मित्रनगरातील तिच्या भावापर्यंत ही घटना पोचली. बहिणीचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त समजल्यानंतर घटनास्थळाकडे धाव घेतलेला मोठा भाऊ शिवराजने आक्रोश केला. घरी आईला, मावशीला सांगू नका, उपचारासाठी दाखल केले असे सांगा, अशी विनंती तो करत होता. त्यानंतर त्याने सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. 
बातम्या आणखी आहेत...