आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Released Information About The Use Of Sound Interposition

ध्वनिक्षेपक वापराविषयी पोलिसांकडून सूचना जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर - सण-उत्सवकाळात ध्वनिक्षेपक वापराविषयी पोलिस आयुक्तांनी सूचना जारी केली आहे. वापराविषयी पूर्व परवानगी आवश्यक आहे. तसेच, आवाजाची मर्यादा नियमातच असली पाहिजे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही प्रसिद्धपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापराविषयी राज्य सरकारने १३ मार्च २०१५ रोजी नियम घालून दिले आहेत. ध्वनिप्रदूषण नियम २०० महाराष्ट्र मुंबई पोलिस अधिनियम १९५१नुसार लिखित परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरता नाही. यासंदर्भात तक्रार आल्यास आवाजाची मर्यादा तपासून कारवाई करण्यात येईल. तसेच, विनापरवाना असल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. परवाना देताना या आधी नियमाचा भंग झालेला नसल्यची खातरजमा करण्यात येईल. त्यानंतरच अटींवर परवाना देण्यात येणार आहे. या आधी नियमाचा भंग झालेला असल्यास परवान्याविषयी विचार होणार आहे.

मंडळाच्या बैठका घेणार
गणेशउत्सव,नवरात्र, दहीहंडी आदी उत्सवांवेळी आधी मंडळांच्या बैठका घेण्यात येतील. कायद्याची माहिती देण्यात येईल. उल्लंघन झाल्यास होणाऱ्या शिक्षेची माहिती पोलिस प्रशासन देणार आहे.