आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस देणार हरेक मंडळास जनजागृतीचे माहिती फलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिस अापले चांगले मित्र अाहेत. पोलिसांना मदत करा. घराबाहेर जाताना दरवाजाला चांगला कुलूप लावा. सुरक्षिततेची काळजी घ्या. दागिने सांभाळा, पाॅलिशच्या बहाण्याने कुणी अाल्यास दागिने देऊ नका. मंगळसू्त्र हिसकावणा-या चोरांपासून सावध राहा. बेवारस वस्तूपासून सावध राहा अशा शभंराहून अधिक सूचना देणारे फलक शहरातील पंधराशे मंडळांना पोलिस अायुक्तालायातर्फे देण्यात येत अाहेत. जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची ही धडपड अाहे.
शहरात गणपती उत्सवाचा जल्लोष सुरू अाहे. अनेक मंडळांनी देखावेही सुरू केले असून पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत अाहे. या कलावधीत प्रत्येक गणपती मंडपाजवळ फलक लावण्यात येणार अाहे. किमान पाच ते सहा फलक अाहेत. त्यावर मंडळासाठी सूचना, सोसायट्या, काॅलन्यांसाठी सूचना, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सूचना, महत्त्वाच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी, बेवारस वस्त्तूंपासून दूर राहणे अादींची नियमावली फलकावर दिली अाहे.

ध्वनिप्रदूषण मर्यादा पाळा
-डाॅल्बी लावू नका, मद्यपी मिरवणुकीत सामील नको
- पोलिसांच्या सूचनांचे पालन करा, वाहतूक नियम पाळा
- परगावी जाताना दागिने, पैसे घरात ठेवू नका
- पोलिस दागिने काढून ठेवा म्हणून सांगत नाहीत, असे कुणी सांगत असल्यास सावध राहा
- पाॅलिशच्या बहाण्याने अाल्यास दागिने देऊ नका
- फेसबुक, व्हाॅट्स अॅप अथवा सोशल मीडियावर अनोळखी ग्रुपवर सहभाग घेऊ नका
- बँक अकाऊंट, इमेल अायडी कुणालाही देऊ नका
- रेल्वे स्टेशन, बसस्थानक, चित्रपटगृह, माॅल, बाजारपेठा, गर्दीचे ठिकाणी काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका.
- जास्त नागरिकांपर्यंत

जाण्याचा प्रयत्न
^सुमारे१५००हून अधिक मंडळांना सूचना फलक देणार अाहोत. मिरवणुकीतही फलक लावण्यासाठी सूचना देणार अाहे. जनजागृती करण्यासाठी जास्तीतजास्त लोकांना सुरक्षिततेची माहिती देण्याचा प्रयत्न अाहे.” पौर्णिमा चौगुले, पोलिस उपायुक्त

सदर बझार पोलिसांची शुक्रवारी अापल्या परिसरातील गणपती मिरवणूक मार्गावर रूट मार्च केला. सातरस्ता, संभाजी तलाव, बेडरपूल अादी भागात तीनशेहून अधिक पोलिसांनी यात सहभाग घेतला होता. क्यूअारटी पथक, कमांडो पथक, एसअारपी पथकाचे जवान सहभागी होते.
बातम्या आणखी आहेत...