आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Policemen Debacle, Temple Committee Set Up Column

पोलिसांच्या लाठीची आडकाठी तरीही मंदिर समितीने रोवला खांब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिसांचा हस्तक्षेप झुगारून मंदिर समितीने सोमवारी मार्केट पोलिस चौकी ते हरिभाई देवकरण या वादग्रस्त मार्गावर खांब रोवला. खड्डा खोदणारे कार्यकर्ते आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलिस यंत्रणा यांच्यांत शाब्दिक संघर्ष रेटारेटीमुळे दुपारी काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

मागील दोन दिवसांपासून ग्रामदैवताच्या यात्रेतील गड्ड्याच्या जागेच्या वादासाठी सुरू असलेल्या चक्री उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दुपारी अचानक पुन्हा वेगळे वळण लागले. मंदिर समिती पदाधिकाऱ्यांनी गड्ड्याच्या उभारणीच्या भूमिपूजनासाठी रस्त्यावर खड्डा मारीत एक वासा उभारला. त्याचे पूजन सुरू असताना दुपारी वाजून ५० मिनिटांनी पाेलिसांनी रस्ता खोदू नका असे म्हणत कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला.
पोलिसांनी जमावाला घेराव करीत हा खांब हिसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर पोलिसांनी सबुरी दाखवित माघार घेतली. पोलिस सकाळपासूनच मोठ्या तयारीत होते. दंगा रोखणारी सर्व आवश्यक यंत्रणा लावण्यात आली होती. पोलिसांचा प्रचंड फौजफाटा वाहने परिसरात होती. महिला पोलिसांचीही वेगळी व्यवस्था होती.

होम मैदानाशेजारील वादग्रस्त रस्त्यावर सिद्धेश्वर मंदिर समितीने खांब रोवून पूजन केले.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले असून जिल्हाधिकारी ऐकत नाहीत हे चुकीचे आहे. नगरसेवक चेतन नरोटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, माजी आमदार आडम यांनी आता कुठे आहेत पालकमंत्री? असा जाब विचारत प्रशासन आणि पालकमंत्र्यांवर टीका केली. तसेच उपोषण भाषणे करण्यापेक्षा टिकाव घ्या रस्ता खोदा असे ते म्हणाले.

आज मोर्चा उपोषणही
मंगळवारीसकाळी १० वाजता बाळीवेस येथून महिलांचा मोर्चा निघणार असून सरकारचा निर्णय येईपर्यंत चक्री उपोषण सुरूच राहील असे श्री. काडादी म्हणाले. खूपच आपत्तीजनक परिस्थिती असेल तर महापालिका कायद्याच्या ६७ तीन(क) या कलमाच्या आधारे काम केले जाते. या रस्त्यासाठी ५८ लाख रुपये खर्च आला आहे. तो खर्च जिल्हाधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावा असे वक्तव्य जगदीश पाटील यांनी केले तर विशेष सभा घेऊन हे मैदान पूर्ण वर्षभरासाठी देवस्थान समितीला देऊ असे महापौर सुशीला आबुटे यांनी सांगितले.