आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी मुंढे यांच्या विरोधात विधानसभेत येणार मुद्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरचे जल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अाता चांगलेच वातावरण पेटू लागले अाहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच अाता मुंढेंविरोधात विधानसभेत तक्रार दाखल करू, असा इशारा दिला आहे. इतर अनेक नेत्यांनीही तुकाराम मुंढे यांच्या कारभाराविरोधात टीकेची झोड उठवली.

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील सिंचन अाणि चारा छावण्यांचा विषय अधिकच चर्चेत अाला. जिल्हाधिकारी मुंढे हे स्वत:ला समजतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित करूनच मुंढे यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारला विधानसभेत घेरणार असल्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला.

ते म्हणाले, ‘पाणी असतानाही शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही. निर्णय होत नाहीत. त्यांच्या विरोधातील दखलही कोणी घेत नाही. कारभार कोण करतंय, अधिकारी की सरकार, असा प्रश्न उपस्थित झाला अाहे. शासन अधिकारीच चालवत अाहेत असे दिसते. असे सरकार कधीच पाहिले नव्हते. अशा कारभारामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागली अाहे, त्यामुळे येत्या अधिवेशनात जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणार अाहोत.’

पुन्हा चर्चेत येणार मुंढे
यापूर्वीपंढरपूर येथील अाषाढी विठ्ठल पूजेच्या दिवशी मुंढे यांनीच अधिक वेळ पूजा केली, अशी तक्रार महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीच केली होती. हा मुद्दा विधानसभेत चर्चेत अाला होता. अजित पवारांनी हा मुद्दा उचलून धरून तो विधानसभेत मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांनी चांगले काम केल्याचे प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला होता. अाता राधाकृष्ण विखे-पाटील हा मुद्दा मांडणार अाहेत. त्यामुळे मुंढे विधानसभेत पुन्हा एकदा चर्चेत येणार अाहेत.

पालकमंत्रीही नाराज
जिल्हाधिकारीमुंढे यांच्या कारभारावर पालकमंत्री विजयकुमार देशमुखही नाराज अाहेत. या दोघांमध्ये टोकाची विरोधी भूमिका दिसू लागली अाहे. परवा उजनीतून सोलापूरसाठी पाणी सोडण्याबाबत या दोघांमध्ये कुरघोडीचे राजकारण झाल्याची चर्चाही रंगली अाहे. एकीकडे उजनीचे पाणी सोडण्यासाठी मंत्र्यांना भेटून बोलतो, असे पालकमंत्री सांगत होते, तर दुसरीकडे लगेच पाणी सोडण्याचे अादेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिले गेले. त्यामुळे मुंढे यांच्या बदलीबाबतच्या चर्चाही गेल्या काही िदवसापासून रंगल्या अाहेत. पण प्रत्यक्ष बदली झालेली नाही.