आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांमध्येच शह-काटशह, स्वबळाचा सूर कसा लागेल, अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुंबईसह राज्यभरात भाजप-सेना युतीत तेढ निर्माण झाली अाहे. अारोप-प्रत्यारोपाचे वार सुरू अाहेत, हे दोन पक्षात असलेतरी सोलापुरात मात्र युतीपेक्षा भाजपमध्येच अंतर्गत शह, काटशहाचे राजकारण चांगलेच तापले अाहे. त्याची झलक मुंबईत झालेल्या मुख्यमंत्री अाणि नगरसेवक यांच्या बैठकीच्या निमित्ताने दिसून अालीच, पण महापालिकेसाठी अाता अापण स्वतंत्र यंत्रणा उभारू असे सांगून अामदार सुभाष देशमुख यांनीही पालकमंत्र्यांना शह दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा अाहे.

१९८५ चा अपवाद वगळता महापालिकेत सत्तेवर विराजमान होण्याचे स्वप्न पाहणा-या भाजपतील अंतर्गत गटबाजीच्या घटना दिवसेंदिवस चव्हाट्यावरच येऊ लागल्या अाहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी नरेंद्र काळे यांच्या निवडीवरून शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांची नाराजी मुंबई दौऱ्यात चव्हाट्यावर आली. मंुबईत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या नगरसेविकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटता आले नाही.

खासदारअॅड. शरद बनसोडे, आमदार सुभाष देशमुख हे बैठकीत गैरहजर होते. या सर्व ताज्या घटना भाजपमधील शह, काटशह कसा चालू अाहे हेच दाखवून देणा-या अाहेत. युतीचे सोडा भाजपातच बेसूर उमटू लागलेत अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये अाहेत.
भाजपतील वरिष्ठ नेते आणि नगरसेवक यांच्यात समन्वय नाही. पक्षात गोंधळाची स्थिती अाहे. असे असतानाही महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची भाषा सुरू आहे. जेमतेम अाठ महिन्यावर नवडणूक येऊन ठेपली अाहे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष शस्त्रे परजून तयारीला लागले अाहेत.

महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेतील युती तुटण्याची शक्यताच अधिक दिसते अाहे. महेश कोठे शिवसेनेत आल्याने विडी घरकुल भागात पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे या भागातील जागांवर शिवसेना हक्क सांगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे याच भागावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बुथप्रमुखांची भेटी घेत पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागातूनच युती तुटण्याची शक्यता अाहे. मनपात सत्ता आणण्यासाठी युती आवश्यक आहे.

महापालिकेतील प्रश्नघेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सोलापुरातील भाजपच्या नगरसेवकांचे पथक गेले होते. यावेळी नगरसेविकाही मुख्यमंत्र्यांना भेटल्या. १५ मिनिटे चर्चा केली. त्यांच्याकडे निधीची मागणी केली. प्रा. अशोक निंबर्गी, भाजपशहरध्यक्ष
मागणीनुसार काम करतो.

पालकमंत्रीसांगतीलत्याप्रमाणे निधी देण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या वर्षात स५० लाखांचा निधी दिला. जे नगरसेवक भेटतात. त्यांच्या मागणीनुसार काम करतो. भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळेे हे प्रश्न घेऊन येतात. त्यांची कामे मी करतो. कोणाची तक्रार असेल तर नाव सांगा. प्रशांत परिचारक,आमदार

आमदार सुभाष देशमुख यांचा गट सोडून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गोटात सामील झालेल्या नरेंद्र काळे यांच्या विरोधी पक्षनेता निवडीला काही नगरसेवकांचा विरोध होता. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात अाली. तरीही काळे यांचीच निवड झाली. शहराध्यक्षांचाच काळेंना विरोध होता अशी चर्चा रंगली असताना अाता शहर पदाधिकारी निवडीवरूनही शहराध्यक्ष आणि पालकमंत्री यांच्यातील वादास तोंड फुटले अाहे. अामदार सुभाष देशमुख यांनी मागील अाठवड्यात पत्रपरिषद घेऊन मनपासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याचे सांगून सगळ्यांना बुचकळ्यात टाकले अाहे. ही यंत्रणा प्रशासनाविरुद्ध अाहे की, पक्ष संघटनेत कोणी विश्वासात घेत नाही म्हणून अाहे, हे गुलदस्त्यात राहिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...