आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमआयएम’ला पाच पदाधिकाऱ्यांचा निरोपाचा सलाम, काँग्रेसमध्ये परतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पक्षात अन्याय होत आहे, हेकेखोरी सुरू असल्याचा आरोप करत एमआयएम (मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन) पक्षाच्या पाच पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद, कार्याध्यक्ष दौला कुमठे, प्रवक्ता इम्तियाज अल्लोळी, जिल्हा युवक अध्यक्ष जाविद सय्यद, उपाध्यक्ष आसिफ तिम्मापुरे उपस्थित होते. 
 
सय्यद यांनी पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना उमेदवारी दिली नाही. अनोळखींना उमेदवारी दिल्याची तक्रार केली. स्वीकृत सदस्यासाठी सय्यद यांना दिलेला शब्द पाळला नाही. अनेक ठिकाणी भाजपला सहकार्य होईल, अशी उमेदवारी दिल्याचा आरोप केला. 

ते पुढे म्हणाले की, एमआयएम भाजपचा ‘बी’ पक्ष म्हणून काम करत आहे. महाराष्ट्रात, बिहार, उत्तर प्रदेश येथील निवडणुकीतून हे दिसून आले. आमदार इम्तयाज जलील, हैदराबाद येथील आमदार तसेच निरीक्षक यांना भेटून हकीकत सांगितली. मात्र त्यांनी गांभीर्य दाखवले नाही. तर ओवेसी बंधूंनी भेट टाळली. जे लोक पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देत नाही. ते मुस्लिम समाजाला काय न्याय देणार?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

नऊपैकी आठ नगरसेवक क्रियाशील सदस्यच नाहीत 
एमआयएमच्या नगरसेवकांपैकी शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या व्यतिरिक्त कोणीही पक्षाचा क्रियाशील सदस्य नसल्याची खळबळजनक माहिती त्यांनी दिली. तौफिक शेख यांनी याबाबत लक्ष दिले नाही. त्यांनीसुध्दा मनमानी केली. सध्या काहीच अधिकार नसलेले लोक पक्ष चालवत आहेत, असा आरोप करण्यात आला. 
 
बातम्या आणखी आहेत...