आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांद्याच्या दरात घसरणीमागे दुसरेच राजकारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री सिद्धेश्वर बाजारपेठेत दिवसेंदिवस कांद्याच्या दरात बरीच घसरण होत आहे. तीन महिन्यांपूर्वी हजार रुपये प्रति क्विंटल असलेले दर आजमितीला एक हजाराच्या आत आले आहेत. कृषीमालाचा दर्जा कमी आहे यासाठी दर कमी आलेत, की ही शेतकऱ्यांची करण्यात आलेली फसवणूक हा चर्चेचा विषय आहे. पण शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की, ही चक्क आमची फसवणूक आहे.

प्रतिवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला असे कारस्थान होते. कारण, उन्हाळ्याच्या सुरुवातीला आलेला कांदा कमी दरात घेण्यात येतो तो साठवून पावसाळ्यात अधिक दराने विकण्यात येतो. आजपर्यंत असेच होत आले आहे. पण राज्यात नावाजलेल्या बाजार समित्यांत अशीच स्थिती असल्याचे दिसून आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत कांद चाळ उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे.

कांदा चाळ योजनेवर पाणी : सरकारकडून कांदा साठवणूकसाठी कांदा चाळ ही योजना आहे. यासंदर्भात योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि अशिक्षित शेतकरी याचा फायदा उचण्यात येत आहे.

लासलगावात अशी परिस्थिती : राज्यात नावाजलेल्या लासलगाव बाजार समितीत अशीच स्थिती आहे. येथे सोमवारी १४ मार्च रोजी कांद्याला प्रति क्विंटल ४०० ते ८०० रुपये असा दर होता. सरासरी ६५० ते ७०० रुपये दर सुरू आहे. यंदा अधिक माल येत असल्याने अशी पडझड असल्याचे लासलगावचे ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी निलेश देसाई यांनी सांगितले.

दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी अशी ओरड असते. कमी किमतीत कांदा उचलण्यात येतो. पावसाळ्यात हा साठवलेला कांदा चढ्यादराने ग्राहकांना विकण्यात येतो. आप्पासाहेब तोळणूर, शेतकरी
बातम्या आणखी आहेत...