आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस-राष्ट्रवादी जमेना, भाजपची खदखद थांबेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेतील सत्ताधारी विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत वाद विकोपाला गेले आहेत. महापालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेले उपमहापौर प्रवीण डोंगरे यांचा चिल्ड्रन पार्कचा विषय ९० दिवसांत घेतला नाही. त्यामुळे आयुक्तांकडे विषय परत गेला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज आहे.
कृष्णहरी दुस्सा पांडुरंग दिड्डी यांच्यात विरोधी पक्षाच्या निधीवरून वाद सुरू आहे. त्यात शहरध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी उडी घेतली आहे. अधिकृत विरोधी पक्षनेता म्हणून कृष्णहरी दुस्सा हेच दावा करतात. पण त्यांनी मागील वर्षी तब्यतीचे कारण देत पक्षाकडे पदाचा राजीनामा दिला हाेता. त्यामुळे प्रभारी विरोधी पक्षनेता म्हणून पांडुरंग दिड्डी यांची नेमणूक केली. त्यावेळी प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिड्डी यांचा सत्कार केला होता. दिड्डी यांनी सुचवलेल्या कामास दुस्सा यांनी आक्षेप घेत मनपा आयुक्ताना पत्र देऊन ती कामे रद्द करावीत, मी विरोधी पक्षनेता आहे असे म्हटले आहे. त्यावर दिड्डी यांनी दुस्सा यांना पत्र देऊन त्याबाबत खुलासा मागितला. यात भाजपचे शहरध्यक्ष प्रा. निंबर्गी यांनी उडी घेत विरोधी पक्षनेत्याचा निधी रद्द करावा अशी पक्षाची भूमिका असल्याने ती कामे करू नयेत म्हटले आहे.

चिल्ड्रन पार्कवरून राष्ट्रवादी नाराज
महापालिकेतमोठ्या पक्षात अंतर्गत वाद असला तरी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात वाद विकोपाला गेला आहे. चिल्ड्रन पार्कचा विषय घेतला नाही म्हणून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी गटनेता दिलीप कोल्हे, उपमहापौर डोंगरे, स्थायी समिती सभापती पद्माकर काळे यांनी शहराध्यक्षांकडे महापालिकेच्या कामकाजाची तक्रार करून वेगळा विचार करण्याची भूमिका घेतली.

महापौर,उपमहापौर यांच्यातही वाद
दुसरीकडे महापौर उपमहापौर यांच्यात वाद विकोपाला गेला आहे. महापौर सुशीला आबुटे काँग्रेसच्या आहेत. यापूर्वी नामाविधान समिती बैठकीत वाद झाला होता. सभागृहात विषयावर निर्णय घेताना राष्ट्रवादीला विश्वासात घेतले जात नाही. याबाबत विचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव महापालिकेत येणार असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली.