आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश नसल्याने १५ विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले; शासकीय तंत्रनिकेतनचा तुघलकी कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गणवेशा शिवाय(ड्रेसकोड) परीक्षेला बसता येणार नाही, हा नसलेला, पण शिस्तीच्या नावाखाली स्थानिक पातळीवर अाणलेल्या नियमाची शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाने अतिरेकी अंमलबजावणी केल्यामुळे गुरुवारी १५ विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या भाग्यश्री पाटील या विद्यार्थिनीला चक्कार आली. शासकीय तंत्रनिकेतनच्या या तुघलकी कारभारामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीस कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सम्राट चौकातील एसईएस चंडक पॉलिटेक्निकची भाग्यश्री सोमशंकर पाटील (रा. कोथळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हिचा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या प्रथम वर्षातील एम टू हा विषय राहिला होता. परीक्षेसाठी ती गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास शासकीय पॉलिटेक्निकमध्ये आली. तिच्याबरोबर जवळपास १५ विद्यार्थी होते. गणवेशाशिवाय परीक्षा देता येणार नाही,असे सांगण्यात आले. तिच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विनवणी केली, मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

ड्रेसकोड अनिवार्य होता
^विद्यार्थ्यांची ओळख पटावी, बाहेरचे विद्यार्थी कॅम्पसमध्ये येऊ नयेत यासाठी आपापल्या कॉलेजचा ड्रेसकोड अनिवार्य करण्यात आला होता. तसे विद्यार्थ्यांना कळविले होते. ड्रेसकोडमध्ये नसलेल्यांना तो घालून येण्याची मुभा दिली. पण एक विद्यार्थिनी अडून बसली. तिच्याकडे हॉलतिकीट असले तरी एसईएसच्या प्राध्यापकांनाही ती कॉलेजची विद्यार्थिनी असल्याची ओळख करता आली नाही. त्यामुळे परीक्षेला बसू दिले नाही. प्राचार्यस्वाती देशपांडे, शासकीय तंत्रनिकेतन,

परीक्षेसाठी ड्रेसकोड नसतोच
^परीक्षेसाठी ड्रेसकोडचा नियम नाही. तो शिस्तीचा भाग होता. समन्वय बैठकीवेळी हा मुद्दा चर्चेला आला होता. वेळीच संपर्क साधला असता तर गणवेश नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसात टाळता आले असते. डॉ.व्ही. आर. मानकर, उपसचिव, तंत्रशिक्षण मंडळ, पुणे

भाग्यश्रीला चक्कर अाली
भाग्यश्रीच्याहृदयाचे तीन वर्षापूर्वी ऑपरेशन झाले आहे. शिक्षकांनी विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने तिचे हातपाय थरथरू लागले. त्यामुळे प्राध्यापकांनी तिला अन्य एका विद्यार्थिनीचा ड्रेस दिला. यावर इतर वंचित विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे भाग्यश्रीला परीक्षेला मुकावे लागले. आमच्या कॉलेजचा ड्रेस परिधान करून फसवणूक करते का, असा दम तिला देण्यात आला. त्यामुळे तिला रडू कोसळले. ती चक्कर येऊन ती पडली. प्रा. सरोज पाटील यांनी तिला शासकीय रुग्णालय नेले. उपचारांनंतर काही शिक्षकांनी तिला कारमधून जुळे सोलापूर येथील नातेवाइक संजय आलेगावे यांच्याकडे सोडले, अशी माहिती भाग्यश्रीने दिली.