आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिसदस्यीय चौकशी समितीसमोर बारा विद्यार्थ्यांनी मांडली बाजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गणवेशची सक्ती करत काही विद्यार्थ्यांना चक्क परीक्षा हॉलबाहेर काढणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनच्या स्वाती देशपांडे, संबंधित विद्यार्थी यांची त्रिसदस्यीय चौकशी समितीने बाजू समजून घेतली. एसईएस चंडक पॉलिटेक्निकचे प्राचार्य, त्यांचे प्राध्यापक आणि घटनेशी संबंधित प्राध्यापक यांच्याशी समितीने संपर्क साधत घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला.

चौकशी समिती अध्यक्ष प्राचार्य व्ही. आर. राव दसूरवाडी पुणे इन्स्टिट्यूट, शासकीय तंत्रनिकेतन पुणेचे उपप्राचार्य आर. एम. शिकारी आणि दसूरवाडी इन्स्टिट्यूट पुणेचे परीक्षा नियंत्रक प्रा. ए. वाय. देवरे या त्रिसदस्यीय समितीने सोमवारी सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्य स्वाती देशपांडे यांची चौकशी करून परिस्थिती जाणून घेतली. संबंधित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. १९ नोव्हेंबर रोजी गणवेश नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले गेले नव्हते. तसेच एक दिवस आधी म्हणजे १८ नोव्हेंबर रोजी गणवेश नसलेल्या तीन विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार झाला. विद्यार्थ्यांनी झालेल्या अन्यायाबाबत कोणतीच वाच्यता केली नाही, अशी माहिती चौकशी समितीसमोर आली.

अहवाल अवलोकन करून निर्णय
^सोलापूर शासकीय तंत्रनिकेतनमधील घटना कळाल्यानंतर तातडीने तटस्थ अशी चौकशी समितीची नियुक्ती केली गेली. समितीला जी आहे ती सत्य परिस्थिती मांडण्यास सांगितले आहे. अहवालाचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घेता येईल. डॉ.अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण मंडळ , मुंबई

विद्यार्थी संघटनेचे निवेदन
प्राचार्या स्वाती देशपांडे यांची चौकशी करण्यास आलेल्या समितीसमोर विविध विद्यार्थी संघटना दाखल झाल्या. यात भारतीय विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, यूथ संघटनेचे अध्यक्ष सागर वाघमारे, राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे राजकुमार लांडगे, आंबेडकर यूथ असोसिएशनचे शेखर बंगाळे आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली गणवेश घातलेल्या विद्यार्थिनीमार्फत निवेदन दिले.

दोन दिवसांत अहवाल
^राज्य तंत्रशिक्षण मंडळाने चौकशी समितीचे गठण केले. प्रकरणाची शहनिशा करण्याचे समितीला सूचित केले होते. सर्व बाजू समजून घेतल्या आहेत. सत्य परिस्थितीचा आमचा अहवाल आम्ही येत्या दोन दिवसात तंत्रशिक्षण मंडळ संचालकांना सादर करणार आहोत. त्यावरील निर्णय अथवा पुढील कारवाई तंत्रशिक्षण मंडळाकडून होईल. व्ही.आर. राव, अध्यक्ष, चौकशी समिती