आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोकणातील पाणी आणता येईल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर | कोकणखाडीतील पाणी उचलून ते सह्याद्री पर्वतामधील धरणांमध्ये आणल्यास सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवता येणे शक्य असल्याचा दावा मंगळवेढा येथील महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीचे प्रा. दत्तात्रय खडतरे यांनी केला आहे. या बाबत औरंगाबाद येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर योजनेचे सादरीकरण केल्याचेही त्यांनी सांगितले. या साठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी जेवढा खर्च येणार आहे, त्याच्या फक्त २५ टक्के निधीमध्येच ही योजना पूर्ण होऊ शकते अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रा. खडतरेंच्या योजनेची वैशिष्ट्ये
यासाठीएक गुंठासुद्धा भूसंपादन करण्याची गरज नाही. कुणाचाही विरोध होणार नाही. कोयना धरणात हे पाणी येऊ शकल्याने अखंड वीजनिर्मिती होऊ शकते. अखंड वीजनिर्मितीमुळे औद्योगिकीकरणास चालना मिळू शकते. अशा पद्धतीने उजनी धरणात पाणी आल्याने सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे शक्य होईल. मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी ३५ गावांचा प्रश्न मिटू शकेल.