आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे यंत्रमाग उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मेक इन इंडीया, स्टार्टअप इंडीया हे फसवे योजना आणत असून, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. सोलापूर, इंचलकरजी येथील यंत्रमाग उद्योग बंद पडत आहेत. यास सरकार जबाबदार आहे. भाजपा एकीकडे कॅशलेस योजना आणत असताना, भाजपाचे नेते कॅश घेत आहेत असा आरोप काॅग्रेसचे प्रदेशअध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

काॅग्रेस प्रचारासाठी सोलापुरात आले असता रविवारी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, आमदार प्रणिती शिंदेे, माजी खा. धर्मण्णा सादूल, सोलापूरचे प्रभारी मोहन जाेशी आदी उपस्थित होते. खा. चव्हाण म्हणाले, तीन वर्षात केंद्र तर दोन वर्षात राज्य सरकार जे चुकीचे निर्णय घेतले ते जनतेसमोर मांडणार आहोत. पारदर्शक म्हणायचे बाबीवर भाजपा बोलत असले तरी सेनेच्या कारभारावर टिका करत आहे. हे चिंताजनक आहे. दिखावा करुन जनतेची फसवणुक करायची आणि पुन्हा सत्तेसाठी एकत्र यायचे सत्तेसाठी प्रयत्न होत अाहेत. ते जनहितासाठी नाही.

मेकइन इंडीया, स्टार्टअप इंडीया फसवे 
मेकइन इंडीया, स्टार्टअप इंडीया हे फसवी योजना आहे. मुंबई आणि पुण्यात लोकांना कळून चुकले अाहे. यंत्रमाग उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यांचा परिणाम स्थानिक कामगार आणि उत्पन्नावर होणार आहे. भाजपा नागरिकांना कॅशलेस योजना सांगतो पण त्यांच्या पक्षातील नेते कॅश घेताना सापडतात तिकीट वापरात पैशाचा व्यवहार होत असेल तर चिंताजनक परिस्थिती आहे. भाजपाचे प्रदेशध्यक्ष लक्ष्मी दर्शनाची भाषा वापरतात. 

विमानात फिरणारे ग्रामीण भागात रस्त्यावरुन फिरावे 
मंत्री विमानातून फिरत आहेत. त्यांना ग्रामीण भागातील रस्ते माहिती नाही. त्या रस्त्याची आवस्था बिकट आहे. ग्रामीण शेतीमालाला भाव नाही. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना पाठबळ दिले जात नाही. नोटाबंदीनंतर परिणाम झाले नाही त्यांची खात्री करण्यासाठी व्यापाऱ्यांना विचारा किंवा प्रत्यक्षात बाजारात गेल्यावर कळून येईल. त्यावर कोणी बोलत नाही. 

पुढील स्लाइडवर क्लिक वाचा, भाजपा सत्तेची भिती दाखवते

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...