आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणिती शिंदे संसदेला घालणार घेराव, त्यानंतर जंतर-मंतर- २५ एप्रिलला दिल्लीत धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विडी उद्योग महिला कामगारांना वाचवण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका जाहीर केली. २५ एप्रिलपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होत आहे. त्याच वेळी आमदार शिंदे कामगारांना घेऊन संसदेला घेराओ घालणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देतील. तेथेही मार्ग निघाला नाही तर थेट जंतर-मंतरवर उपोषणाला बसणार आहेत.

धूम्रपानविरोधी कायद्यातील वेष्टण नियमांत ८५ टक्के भागात सचित्र धोक्याचा इशारा देण्याची सक्ती करण्यात आली. त्याचे उल्लंघन झाल्यास उत्पादकांना कैद आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. त्याला विरोध करत विडी उत्पादकांनी एप्रिलपासून कारखाने बंद ठेवले. त्यामुळे महिला कामगारांची आर्थिक कोंडी झाली. या विवंचनेत अनेक महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात दोघांचा मृत्यूही झाला. या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

आता माघार नाहीच
विडीउद्योग वाचला तरच कामगारांची रोजी-रोटी वाचेल. रोजगार वाचविण्यासाठी दिल्लीत धडक देणार. आता माघार नाहीच.” अामदार प्रणिती शिंदे

कामगारांसाठी अन्न बँक
महिला कामगारांचा प्रश्न सुटेपर्यंत त्यांना दोनवेळचे जेवण देण्यासाठी आमदार शिंदे यांनी फूड बँक सुरू करण्याची घोषणा केली. धान्य स्वरूपात मदत देण्यासाठी ९८५०३८८५७९ येथे संपर्क साधावा.

प्रणिती शिंदे यांनी येत्या लोकसभा अधिवेशनावेळी िदल्लीत अांदोलन करणार असल्याचे अाज विडी कामगार महिलांच्या मेळाव्यात जाहीर केले. यावेळी महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कारखाने सुरू करा; चक्री उपोषण सुरू
गेल्या१६ दिवसांपासून विडी कारखाने बंद आहेत. त्यामुळे कामगारांची आर्थिक कोंडी झाली. त्यांचे आत्महत्येचे प्रयत्न सुरू आहे. शासन, प्रशासन त्याची दखल घेत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार, कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे नगरसेवक अनिल पल्ली यांनी केले आहे. धूम्रपानविरोधी कायद्यातील जाचक नियमांना विरोध म्हणून कारखानदारांनी एक एप्रिलपासून कारखाने बंद ठेवले. त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले. विड्यांवरच कुटुंबाचा चरितार्थ असणाऱ्या महिला विषारी रंग पिऊन जीवनयात्रा संपवत आहेत. एवढी गंभीर स्थिती असूनही कारखानदार त्याची दखल घेत नाहीत. परिस्थिती चिघळत चालली. त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे पल्ली यांनी म्हणणे आहे.
या आंदाेलनात सुदर्शन विडप, यादगिरी वड्डेपल्ली, श्रीकांत पुकाळे, श्रीनिवास सामलेटी, शांताराम सीता, विशाल नल्ला आदी सहभागी झाले आहेत.