आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेहिशेबी रोकडप्रकरणी सहकारमंत्र्यांची ‘विकेट’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बेहिशेबी ९१ लाख रुपयांच्या प्रकरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख पूर्णत: गुंतले आहेत. त्यांनी केलेले खुलासे त्यास पूरक आहेत. तो पैसा पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा अन्य कोणाला पाठविण्यात येत होता, याचा खुलासा झालाच पाहिजे, असे सांगत येत्या हिवाळी अधिवेशनात सहकारमंत्र्यांची विकेट घेणारच, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसभवनमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. राज्यातील भाजप-सेना युतीचे मंत्री भ्रष्टाचारात बुडाले आहेत. गेल्या महिन्यांपासून सातत्याने नवीन प्रकरण उघडकीस येत आहेत. आता सहकारमंत्री देशमुख यांच्या बँकेतील ९१ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली. नोटाबंदीचा आदेश असताना त्या नोटा कुठे पाठविण्यात येत होत्या? स्वत: सहकारमंत्र्यांनी त्याबाबत परस्पर विरुद्ध खुलासे करीत अनियमितता झाल्याचे मान्य केले आहे. त्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यास आगामी निवडणुकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांना सहकारमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडू. त्यांची विकेट निश्चित जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...