आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ग्लॅमरस राजकारणीने कमी कालावधीत केले स्‍वत:ला सिद्ध, वडिलांकडून मिळाले बाळकडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अत्‍यंत खडतर परिस्‍थितीवर मात करत राजकारणात केंद्रिय मंत्रीपदापर्यंत मजल मारलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जीवनप्रवास नक्‍कीच प्रेरणादायक आहे. त्‍यांच्‍याच पायावर पाय ठेऊन राजकारणात आलेल्‍या त्‍यांच्‍या कन्‍या प्रणिती शिंदे यांनीही आज महाराष्‍ट्रात लोकप्रियता मिळवली आहे. सुरूवातीच्‍या काळात राजकाराणापेक्षा त्‍यांना समाजसेवेत अधिक रस असल्‍याचे दिसते. 1 मे 1970 या दिवशी म्हणजे महाराष्‍ट्र दिनी सुशीलकुमार शिंदे यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्‍या निमित्‍त जाणून घेऊया त्‍यांच्‍या कन्‍या प्रणिती यांचा थोडक्‍यात राजकीय प्रवास....
वडिलांकडून मिळाले बाळकडू..
- कॉंग्रेस आमदार प्रणिती यांना राजकारणाचे बाळकडू वडील सुशीलकुमार यांच्‍याकडून मिळाले.
- सुरुवातीच्‍या काळात राजकाराणापेक्षा त्‍यांना समाजसेवेत अधिक रस होता.
- प्रणिती यांनी 'जाई जुई विचार मंच' या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून भरीव काम केले. - कला आणि संस्कृती, बालके, पायाभुत सुविधा, दलितांचा विकास, शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कामगार आणि रोजगार, अल्प आर्थिक सहकार्य आदी विषयांवर या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते.
शनी शिंगणापूर महिला प्रवेश बंदीला विरोध....
काही दिवसांपूर्वी शनी शिंगणापूर महिला प्रवेश बंदीला आमदार शिंदे यांनी विरोध केला होता. चौथ-यावर चढणा-या महिलेचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते आणि तिच्या हिमतेची दाद देते. असे त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढं जात आहेत. त्यामुळे याविरोधात सगळ्यांनी आवाज उठविला गेला पाहिजे. याप्रकरणी मी स्वत: विधानसभेत आवाज उठविणार आहे, असे त्‍यांनी सांगितले होते.
प्रणिती यांचे एमआयएमबाबतचे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य....
- आमदार प्रणिती शिंदे यांचे एमआयएमबाबतचे वक्‍तव्‍य चांगलेच वादात सापडले हाते.
- हा पक्ष राष्ट्रविरोधी असून, त्याच्यावर आणि त्याच्या नेत्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती.
- त्‍यानंतर प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एमआयएमने आक्रमक पावित्रा घेतला होता.
- या वादग्रस्त वक्तव्याची माफी मागावी, अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली होती.
-एमआयएमच्या वकिलांनी प्रणिती शिंदेंना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेतील ऍड. खिजर पटेल यांच्यामार्फत ही नोटीस पाठविली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आमदार प्रणिती यांच्या प्रवासाबाबत थोडक्‍यात....