आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे दोषमुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आचारसंहिताभंग केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावरील खटला रद्द करून न्यायदंडाधिकारी ए. बी. कुरने यांनी त्यांना दोषमुक्त केले. मागील विधानसभेसाठी शहर मध्य मतदार संघातून प्रणिती शिंदे निवडणूक लढवत होत्या. १० ऑक्टोबर २०१४ रोजी घनाते कॉम्प्लेक्स, वालचंद महाविद्यालयासमोर त्या कॉर्नर सभा घेत होत्या. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केली असता, त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे उघडकीस आले होते. जेलरोड पोलिसात फिर्याद दिली होती. सभेच्या चित्रीकरणाची सीडी पुराव्यासाठी सादर केली होती. शिंदे यांच्यातर्फे अॅड. अन्विल कालेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. फिर्यादच बेकायदा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिंदे यांना दोषमुक्त केले. सरकारतर्फे अॅड. श्रीमती चव्हाण यांनी काम पाहिले.