आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम बांधवांची पावसासाठी नमाज पठण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या साठ दिवसांपासून पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी व्यापारी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. पाऊस पडावा यासाठी कुर्डुवाडी शहरातील मुस्लिम बांधवांनी टेंभुर्णी रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी ११ वाजता नमाज पठण केला. यावेळी दोनशे मुस्लिम वृद्ध, तरुण बालक उपस्थित होते.
जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतली होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीसाठी तरी पाऊस पडावा अशी आशा आहे. बाजारपेठेमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी व्यापारी हवालदिल झाला आहे. पाऊस पडावा यासाठी शहरातील मक्का मशिदचे हाजी उस्मान हाफिज, जामा मशिदीचे अब्दुल मौला मदिना मशिदीचे गनी मौलाना यांनी नमाज पठण केले. पावसासाठी याचना केली. अब्दुल हसनत मदरशामधील विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली.
यावेळी नगरसेवक समीर मुलाणी, उमरसाहेब दारूवाले, अल्लाहुसेन शिकलगर, वाहिद शेख, लतीफ मुलाणी, मोहसीन मकणु, वल्लीमहंमद मुलाणी, हमीद शिकलगर, अर्शद मुलाणी, वाजिद कुरेशी, नासिर दाळवाले, माजी नगरसेवक संजय गोरे, सोमनाथ देवकते उपस्थित होते. नमाज पठणानंतर माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.