आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलाची नित्यपूजा अन् महापूजेची झाली रंगीत तालीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदा पाद्यपूजा, नित्य पूजा मुख्यमंत्र्यांची महापूजा वेळेत व्हावी यासाठी याची रंगीत तालीम घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. आषाढी एकादशीदिवशी विठ्ठलाची पाद्यपूजा खासगीवाले करत असत. सर्वेाच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही पूजा मंदिर समितीतर्फे होणार आहे.

नित्यपूजा आणि मुख्यमंत्र्यांकडून होणारी महापूजाही होणार आहे. या तीनही पूजा दीड तासाच्या अवधीत होतील, यामुळे लांबून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना तिष्ठावे लागणार नाही. तीन पुजेमधील वेळ वाचवण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या मध्यरात्री दीड वाजता पूजेसाठी मंदिर बंद होईल. यानंतर पंधरा मिनिटे मंदिर स्वच्छतेसाठी पूजेची सिद्धता करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

पूजेच्या वेळ
१.४५ते १.५५ या वेळेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाद्यपूजा होतील.
१.५५ ते २.२० या वेळेत विठ्ठलाची नित्यपूजा.
२.२० ते २.४५ या वेळेत मुख्यमंत्र्यांची महापूजा होईल. यानंतर मुख्यमंत्री रुक्मिणी मातेची महापूजा करतील.
२.२० ते २.४५ या वेळेत मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रुक्मिणी मातेची महापूजा करतील.
जिल्हाधिकारी २.४५ ते विठ्ठलपूजा करतील.
तीन वाजल्यानंतर म्हणजे अवघ्या दीड तासात मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होईल.
बातम्या आणखी आहेत...