आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात शुक्रतारा उजळून निघाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोजागरी पाैर्णिमेचा शीतल प्रकाश. शिवछत्रपती रंगभवनच्या दारात काढलेली सुंदर रांगोळी, विद्युत रोषणाई अाणखीनच मनाला अानंद देणारी. अगत्याने प्रत्येकाचे होणारे स्वागत. प्रसन्न अाणि अाल्हादायक वातावरण, तबला, पेटी, सिंथेसायझर, बासरीच्या सुमधूर संगीतात अन् अविरत उठे या दिना, श्रीराम जय राम जय राम या भावगीतांने अासमंतात शुक्रतारा उजळला. निमित्त होते प्रिसिजन गप्पांच्या कार्यक्रमात गीतकार, संगीतकार दातेंच्या सुमधुर गीतांचा.
प्रिसिजन गप्पा कार्यक्रमांचे यंदा अाठवे वर्ष. अरुण दाते यांचे चिरंजीव अतुल दाते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रिसिजन ग्रुपचे प्रमुख यतीन शहा, फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘स्वरंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या गीतांवर समुद्रकाठी थांबल्यानंतर लाटांच्या पाण्याचा शिडकावा व्हावा तसा भाव मनाला स्पर्शून गेला तर दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे या गीतांवर बालपणीची अाठवण झाली. मन हेलावून धुंद होऊ नको, डोळे कशासाठी तुला डोळ्यात साठवून मिटवून घेण्यासाठी या गाण्यावर माना डोलल्या, टाळ्याचा गजर झाला. दिस नकळत जाई, सांजवेल तर जपून चाल, जपून चाल पोरी हे गाणे सादर होताना अनेकांना अानंद देऊन गेला.’ देवाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही....काही बोलायचे अाहे पण, बोलणार नाही.. हे भावगीत सादर होताना भक्तीचा प्रकाश मोरपिसासारखा वाटला.

श्रीरंग सावळा तू ये राधिका, येशील.. येशील.. राणी पहाटे... पहाटे... अशी एकापेक्षा एक सरस भावगीते, भक्तिगीते सादर झाली. हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत होता. कोजागरी पौर्णिमेचा शीतल चंद्र, चमचमणारा शुक्रतारा, संगीत अाणि सुरांचं चांदणं. सुमधूर गीतांची झालर सर्वांनाच भावली.
मंदार अापटे, विद्या करंदीकर, श्रीरंग भावे यांनी गीते सादर केली. अतुल दाते यांनी अरुण दातेंच्या अायुष्यातील अनेक अाठवणी सांगत त्यांच्या अायुष्याचा जीवनपट उलगडून दाखवला.
निवेदिका अनुश्री फडणवीस यांनी खुमासदार शैलीत केलेले निवेदन भावले. प्रशांत लळीत, अमोल घोडवतीकर, दीपक कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, प्रशांत कांबळे, श्रीरंग माने, महेंद्र शेळके यांनी संगीत साथ दिली. माधव देशपांडे यांनी स्वागत केले.

सोलापुरात अच्छे दिन : अतुल दाते
देशातपरदेशात अनेक कार्यक्रम केले. अाजचा अनुभव कधीच विसरणार नाही. संयोजकांनी अामच्यापेक्षा तीन तास अगोदर येऊन नियोजनाची पाहणी केली. स्वच्छ, शिस्त पाहायला मिळाली. संगीत कार्यक्रमाला अच्छे दिनाची सुरुवात सोलापुरातून झाल्याची भावना अतुल दाते यांनी बोलून दाखवली.

बातम्या आणखी आहेत...