आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती मुखर्जींसाठी गांधी स्टेडियम, विमानतळ सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या दौऱ्यास दोन दिवस शिल्लक असताना जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी विमानतळ, इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क मैदान), शासकीय विश्रामगृह विमानतळ रस्त्याची पाहणी केली. पाहणीत अपूर्ण कामे युद्धपातळीवर शनिवारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
विमानतळ पार्क मैदान शनिवारी रविवारी कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत राष्ट्रपती भवनातील सुरक्षा अधिकारी यांच्या ताब्यात राहणार आहे.

प्रशासकीय आढावा जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी घेतला. मैदानावर कोण कोठून प्रवेश करणार, बंदोबस्त कसा असेल, वाहनतळ व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण आपत्कालीन मार्ग याची पाहणी जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त सेनगावकर यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी योग्य तो पाेलिस बंदोबस्त करण्याच्या सूचनाही केल्या. प्रत्येक प्रवेशद्वारावर विशेष पोलिस बंदोबस्त तपासणी करण्याची यंत्रणा असणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
आमदार प्रणिती शिंदे, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, प्रकाश यलगुलवार, सुधीर खरटमल आदी उपस्थित होते.

दिल्लीतून येणार गाडी
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल सी. विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बुलेटप्रुफ वाहन मागविण्यात आले आहे. राष्ट्रपतींचे वाहन दिल्लीहून तर राज्यपाल मुख्यमंत्री यांचे वाहन मुंबईहून येणार आहे. तिन्ही वाहने शनिवारी सायंकाळपर्यंत सोलापूरला पोहचणार आहेत.

परजिल्ह्यातून मागविली वाहने
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या व्हीव्हीआयपींची संख्या पाहता परजिल्ह्यातून वाहने मागविण्यात आली आहेत. यामध्ये लातूर, उस्मानाबाद, सातारा नाशिक जिल्ह्यातील वाहनांचा समावेश आहे. व्हीव्हीआयपींची संख्या पाहता ५० पेक्षा अधिक वाहने रविवारी लागणार आहेत. याशिवाय काही खासगी वाहनेही जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत.

वायुसेना हेलिकॉप्टरने केली पाहणी
राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरकडून सोलापूर विमानतळाची पाहणी करण्यात आली. हे हेलिकॉप्टर बिदर येथून आले होते. हेलिकॉप्टर उतरविण्याचा सरावही केला. दुपारी १२ च्या सुमारास सोलापूरच्या आकाशात हेलिकॉप्टर भिरभिरत होते. सराव पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हेलिकॉप्टर बिदरला रवाना झाल्याची माहिती विमानतळ प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...