आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून ५६९ अर्ज विक्री, दोन दिवस मुदत वाढवली, महापालिका निवडणूकीची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणूक तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू अाहे. काँग्रेसने मुलाखती घेतल्या तर भाजपने इच्छुकांचे अर्ज मागवले. सोमवारपर्यंत भाजपच्या सर्व नगरसेवकांसह ५६९ जणांनी अर्ज नेले. त्यापैकी २४८ जणांनी अर्ज जमा केले. अर्ज विक्री स्वीकृती मुदत १२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली. 

अर्ज नेणे आणि देण्यासाठी भाजप कार्यालयात गर्दी होत आहे. विद्यमान सर्व नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत. निवडणुकीसाठी भाजपकडून विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. जबाबदारी निश्चित करण्यासाठी रविवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या. समितीत काम करू इच्छिणाऱ्यांकडून मते मागवली. त्यानुसार जबाबदारी देण्यात येणार आहे. 

मनपा जि.प. साठी प्रदेश भाजपकडून सुरू तयारी 
महापालिका अाणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रदेश भाजपकडून तयारी सुरू आहे. सोमवारी सर्व मंत्री आणि आमदारांची बैठक मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. १२ जानेवारी रोजी मुख्यमंत्री हे शहर जिल्हाध्यक्षांची बैठक ठाणे येथे घेणार आहेत. 
 

राष्ट्रवादीकडे ११३ इच्छुक, आज शेवटचा दिवस 
सोलापूर शहरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत. शनिवारपर्यंत पक्षाकडे ११३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाकडे उमेदवारी अर्ज करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस आहे, यामुळे पक्ष कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पक्ष कार्यालयातून २०० पेक्षा अधिक जणांनी अर्ज नेले आहेत. यामध्ये विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी नव उमेदवारांचाही समावेश आहे. 

शिवसेना इच्छुकांना अर्जासाठी १५ पर्यंत मुदत 
सोलापूर महापालिकानिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या अाहेत. अर्ज वितरणासही चांगला प्रतिसाद मिळत अाहे. रविवारपर्यंत (१५ जानेवारी) अर्ज स्वीकारले जातील, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी अर्ज भरुन शिवसेना भवन, जुनी मील कंपाऊड येथे सादर करावेत, असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण यांनी केले अाहे. गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांच्या मुलाखती रंगू लागल्या अाहेत.