आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शिंदे यांचा रविवारी सत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी (दि.४) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्य केंद्रातील अनेक आजी-माजी मंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पाटील म्हणाले, की माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी माझी हृदयमैत्री आहे. मला, राज्यपाल करण्यामध्ये काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह सुशीलकुमार यांचेही मोठे योगदान आहे. त्रिपुराचा राज्यपाल असताना ते केंद्रीय ऊर्जामंत्री होते. त्यांंनी दोन
पॉवरग्रीड प्रकल्प त्या राज्यात दिले. त्याचे उद््घाटन स्वत: करण्याऐवजी त्यांनी माझ्या हस्ते केले, एवढ्या दिलदार स्वभावाचे ते व्यक्तिमत्त्व आहे. त्या ग्रीडच्या माध्यमातून ६० मेगावॉट वीज बांगलादेशला देण्यात येत असून त्यांचे कर्तृत्व इतिहासामध्ये नोंदण्याजोगे आहे.
वाढदिवस साजरा करण्यास त्यांना आवडत नसल्याने दरवर्षी ते परदेशात किंवा इतर राज्यात असतात. पण, आम्हा सर्वमित्रांनी त्यांची भेट घेऊन अमृतमहोत्सव साजरा करण्याची केलेली विनंती त्यांनी मान्य केली. रविवारी (दि.४) दुपारी तीन वाजता इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क स्टेडियम) येथे कार्यक्रमास सुरवात होईल, असे डाॅ. पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणात्सव येणार नाही. पण, त्यांचा शुभेच्छा संदेश येणार आहे. सत्कार सोहळा सर्वांसाठी खुला असून सोलापूरकरांनी कार्यक्रम पाहण्यासाठी यावे, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष सुधीर खरटमल, आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार धर्मण्णा सादूल, प्रकाश यलगुलवार, माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी महापौर नलिनी चंदेले, नगरसेवक चेतन नरोटे, सिद्धाराम चाकोते, केदार उंबरजे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास यांची प्रमुख उपस्थिती
राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, राज्यभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलेजा, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार आनंद शर्मा, विजय दर्डा यांच्यासह मराठी, तेलुगू, कन्नड हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...