आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्तेत आल्यानंतर भाजप नेत्यांनी पहिल्यांदाच घडवले एकीचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात असूनही नेहमीच गटबाजीच्या राजकारणात अडकलेले पालकमंत्री विजय देशमुख अाणि अामदार सुभाष देशमुख हे शनिवारी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एकत्र आल्याचे दिसले. केंद्र सरकारकडून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामे होणार आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नेते एकत्र अाल्याने भाजप कार्यकर्त्यांना हा सुखद धक्काच मानला जातो.
केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवे या विभागाकडून २५ हजार कोटी रुपयांच्या चार महामार्गांचे चौपदरीकरण आणि शहरातील दोन उड्डाणपुलांचे २६ मार्च रोजी दुपारी एक वाजता जुळे सोलापुरातील अंबर हॉटेलच्या समोरील मैदानात गडकरी यांची जाहीर सभा होईल. तसेच सोलापूर शहरातील चौपदरी, दुपदरी, भुयारी रस्ते आणि उड्डाणपुलांच्या कामांचे भूूमिपूजन होणार आहे. ही माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निमित्ताने हे नेते एकत्र अाले होते. तत्पूर्वी भाजपची एक बैठक झाली. त्यातही हे नेते एकत्र अाले होते.

पत्रकार परिषद सुरू झाली पण पालकमंत्र्यांच्या बाजूला बसलेल्या आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पत्रपरिषदेच्या प्रेसनोटची प्रत नव्हती. हे लक्षात येताच पालकमंत्र्यांनी लगेच स्वीय सहायकास आवाज देत, यांनाही द्या की प्रेसनोट असे सांगितले. तर खासदार शरद बनसोडे यांनी पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामनला हात करून दोन मिनिटे थांबा, स्मार्ट सिटीतील पहिली पत्रकार परिषद आहे, जरा भांग पाडतो म्हणत खिशातून कंगवा काढत भांग पाडला. मग आता सुरू करा कॅमेरा असे सांगितले.

एअर इंडियाची चर्चा
होटगी रस्ता विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी यापूर्वी अनेक कंपन्यांचे प्रयत्न फसले. अाता एअर इंडिया सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे खासदार बनसोडे यांनी सांगितले. केंद्रीय अधिकारी गजपती राजू महेश शर्मा यांच्यासमवेत बैठका घेऊन विमानतळ सुरू व्हावे यासाठी निवेदन दिले आहे. एअर इंडिया कंपनी सकारात्मक असून चार महिन्यांत तांत्रिक बाबी तपासून ७२ आसनी प्रतिव्यक्ती अडीच हजार भाडे असणाऱ्या बोइंग विमानासेवा विचाराधीन आहे.

एका वर्षात २५ हजार कोटींची कामे पहिल्यांदाच
आमदार देशमुख म्हणाले, ""मी मागील १८ वर्षांपासून राजकारणात आहे. पण याआधी एका वर्षात एकूण २५ हजार कोटी रुपयांची कामे झालेली नाहीत. राज्य केंद्र सरकार भरीव मदत करत असल्याने सोलापूरच्या वैभवात भर पडेल.''

उड्डाणपूल असे
१. जुना पुणे नाका ते सात रस्ता ते विजापूर रस्ता - ५.८० किलोमीटर्स - ४०० कोटी रुपये.
२. बोरामणी नाका ते कुमठा नाका ते विजापूर रस्ता - ६.५० किलोमीटर्स - ५६० कोटी रुपये.
असे होणार रस्ते
१. सोलापूर ते विजापूर चौपदरी रस्ता - ११० किलाेमीटर्स - १४४७.५६ कोटी रुपये.
२. सोलापूर ते सांगली ते कोल्हापूर चौपदरी रस्ता - २२५ किलोमीटर्स - २२५० कोटी रुपये.
३. सोलापूर ते अक्कलकोट ते गाणगापूर चौपदरी दुपदरी रस्ता - ११० किलोमीटर्स - १००० कोटी रुपये.
४. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कडून टेंभुर्णी अंतर्गत काँक्रिट रस्ता पादचारी भुयारी मार्ग (आढेगाव, सुरली, कन्हेरगाव) - ६.२० किलोमीटर्स - १०७ कोटी रुपये.
बातम्या आणखी आहेत...