आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची पतीसह दोघांकडून फसवणूक, गर्भपात करण्यासाठी आणला दाबाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; सोलापुरातील तरुणीचा विवाह गुजरातेतील तरुणासोबत झाला. कालांतराने ती गरोदर राहिली. पती सासू या दोघांनी मिळून दबाव आणून गर्भपात करण्याचा सल्ला दिला. त्याला नकार दिल्यानंतर तरुणीला सोलापूर येथे सोडून घटस्फोट झाल्याचे सांगितले.

हा प्रसंग गुदरला ज्योती योगेश वधवानी (वय २२, रा. गुजरात, हल्ली शास्त्रीनगर सोलापूर) यांच्यावर. त्यांनी गुरुवारी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे.

योगेश हिम्मतलाल वधवानी अनुसया वधवानी, भिक्षापती श्रीराम (रा. तिघे, गुजरात) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीराम यांच्या मध्यस्थीने ज्योती आणि योगेश यांचा विवाह लावला.
कालांतराने सासू पतीने मिळून तू आम्हाला पसंत नाही, तू माहेरी जा म्हणून छळ सुरू केले. रेशनकार्ड काढायचे आहे म्हणून स्टॅम्प पेपरवर गुजरात भाषेत मजकूर लिहून सही करून घेतली.
तिला सोलापुरात सोडल्यानंतर, मी नांदण्यास तयार असून गुजरातला न्या अशी विनवणी केली असता तुझा घटस्फोट झाला आहे असे सांगून निघून गेले. फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कजागवाले करत आहेत.