आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Previous Water Does Not Investigations Theft, Now 19 New Cases

मागील पाणीचोरीचा तपास नाही, आता नव्याने १९ गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उजनीते सोलापूर या जलवाहिनीतून पाणीचोरी केल्याप्रकरणी दोन ग्रामपंचायतींसह आठ जणांच्या विरोधात महापालिकेने टंेभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. जानेवारी महिन्यात दाखल केलेल्या त्या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी अद्याप पूर्ण केला नाही. यामुळे त्यातील संशयित आरोपींना काहीच झळ पोहोचली नाही. त्यातील काहींनी अटकपूर्व जामीन घेऊन पुन्हा पाणीचोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याआधी दाखल गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला नसताना पुन्हा नव्याने १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिका फिर्याद देते, पण पोलिसांकडून तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होत नाही, असा अनुभव आहे.

दोनवर्षात पाच कोटी रुपयांची झाली पाणीचोरी
मागीलदोन वर्षांत महापालिकेच्या पाच कोटी रुपये किमतीच्या पाण्याची चोरी झाली आहे. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेकडून देण्यात आलेल्या फिर्यादेत पाण्याची किंमत दाखवण्यात आली आहे. सर्व पाणीचोर हे अरण, शेटफळ शिवारातील आहेत. ११ ते ८० लाख इतकी रक्कम आहे.

पाणीचोरीची माहिती देणाऱ्यास बक्षीस
उजनीजलवाहिनीवरील पाणी चाेरी रोखण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. पाणीचोरीची माहिती देणाऱ्यास महापालिका बक्षीस देणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय राहील. याबाबत महापालिका सभेकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सभेची मान्यता घेतल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.

पाणीचोरीप्रकरणी चौघांना अटक
जलवाहिनीतूनपाणीचोरी केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी शुक्रवारी चौघांना अटक केली. पुढील तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लक्ष्मण खंडू सावंत (अरण), गणेश नागनाथ माने (पाकणी, उत्तर सोलापूर), ज्योतिबा ऊर्फ पिंटू श्रीरंग काकडे (निराळे वस्ती सोलापूर), किसन शामराव कापरे (कल्पना टॉकीजजवळ सोलापूर) या चौघांना शुक्रवारी अटक करण्यात आल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांनी दिली.

यांच्यावर दाखल गुन्हे (रक्कमलाखात)
{यशवंत साहेबराव सावंत (५५), { हरिशंकर पाटील (११), { लालासाहेब शिंदे-अरणकर (२२.४२), { साईदास भगवान चव्हाण, राजू गोणे, सूर्यकांत गुळवे (२२.४२), { निवृत्ती स. पाटील (२२), { लक्ष्मण खंडू सावंत (२२), { लालासाहेब मच्छिंद्र रणदिवे (११.२१), { तुकाराम रामकृष्ण सावंत समाधान सौदागर (११.२१), { शामराव राजाराम रणदिवे (११), { गणेश रामचंद्र माने, राजेंद्र नागनाथ खडके वगैरे (२८.४७).

जानेवारीत गुन्हा दाखल होऊनही पुन्हा पाणीचोरी
उजनीते सोलापूर या जलवाहिनीवरून पाणीचोरी होत असल्याने उपअभियंता आर. एन. रेड्डी यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात िफर्याद दिली होती. आठ गुन्हे दाखल झाले, पण त्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला नाही. संशयित आरोपीस अटक केली असेल तर ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक असते, अन्यथा नाही, असे सांगत पोलिसांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. जानेवारीत लक्ष्मण खंडू सावंत यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. आता पुन्हा त्यांच्यावर २२ लाख रुपयांच्या पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोषारोपपत्र नाही
मनपानेयापूर्वी पाणी चोरीचे गुन्हे दाखल केले होते. पण त्याचे दोषारोपपत्र टेंभुर्णी पोलिसांकडून न्यायालयात सादर केले नाही आणि मनपास तसे कळवले नाही. अरुणसोनटक्के, विधान सल्लागार, मनपा

मागीलतपास करून आरोपपत्र
संशयितआरोपीस अटक असेल तर ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. मागील गुन्ह्यांची चौकशी करून दोषारोपपत्र दाखल करू. के.एन. पाटील, पोलिस निरीक्षक, टेंभुर्णी पोलिस ठाणे

राठोड यांची चौकशी सुरू : मनपापाणीपुरवठाचे उपअभियंता विजयकुमार राठोड यांना टेंभुर्णी पोलिसांनी गुरुवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले रात्री सोडले. शुक्रवारी पुन्हा बोलावले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

टाकळी जलवाहिनीची शोध घ्या : सोलापूरते टाकळीपर्यंत मनपाची जलवाहिनी आहे. तेथेही अनधिकृत जोड असण्याची शक्यता आहे. टाकळी जलवाहिनीवरील जोडची गोपनीय माहिती घेण्यात यावी, असा सूर महापालिकेत ऐकण्यास मिळाला.