आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैदी घेताहेत एमबीए, बीबीएची पदवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माणूसजन्मत: गुन्हेगार नसतो. परिस्थिती, काळ अथवा रागाच्या भरात काहीतरी चूक करतो, अन् कायद्याच्या कचाट्यात सापडतो. कालांतराने चूक उमगल्यानंतर पश्चाताप होतो. त्यांना सुधारण्याची संधी मिळावी म्हणून जिल्हा कारागृहातील कैद्यांना एमबीए, बीबीए, बीए, बारावी पदवी घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे पंचवीस कैदी पदवी शिक्षण घेत आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली (अभ्यास केंद्र-वालचंद कॉलेज) यांच्या पुढाकारातून ही सोय झाली आहे. जे कैदी सातवी, आठवी पास आहेत त्यांची बीपीपी (इंटरन्स) परीक्षा घेऊन त्यांना थेट बारावीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

अभ्यास केंद्राचे प्राध्यापक आठवड्यातून दोन-तीनदा कारागृहात येऊन त्यांना कौन्सिलिंग करतात. अभ्यासक्रमाचे पाठपुस्तक देतात. मार्गदर्शन करतात. मुख्य हा अभ्यासक्रम म्हणजे स्वयंम अभ्यास (बहिस्थ अभ्यासक्रम) आहे. भविष्यात पुणे, कोल्हापूर, मुंबई येथील कारागृहातही अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे अभ्यास केंद्राचे विलास हळ्ळीकर यांनी सांगितले. पदवी घेतल्यानंतर नोकरी मिळू शकते. त्यातून कुटुंबाची उपजीविका चालू शकते. केंद्राचे सिद्धू चिन्ने यांचीही साथ मिळते.

संगणक कक्षाची सोय
कारागृहातचसंगणक कक्ष सुरू करण्यात आले आहे. सुदीशा संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. याशिवाय पतंजली योगा केंद्रातर्फे महिला कैद्यांसाठी शिवणकाम प्रशिक्षण सुरू आहे. शंभर कैदी यात सहभागी होत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी दिली.
कवी संमेलन घेण्यात येणार....
येत्याआठ दिवसांत कारागृहात होणार कवी संमेलन
संगणक प्रशिक्षणावेळी वीज गेल्यास जनरेटरची सोय
-कैद्यांचे मानसिक मनोबल उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस
बातम्या आणखी आहेत...