आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका नेहमीच ‘राष्ट्रवादी’विरोधी, सुनील तटकरे यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची मालिका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी सुरूच ठेवली अाहे. ‘चव्हाणांची भूमिका नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात राहिली आहे. खरे तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यामुळेच काँग्रेस- राष्ट्रवादीची युती होऊ शकली नाही,’ असा अाराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केला.
यापूर्वीही राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अजित पवार व अनिल देशमुख यांनीही पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभारावर टीका केली हाेती. त्याला चव्हाणांनी नुकतेच प्रत्त्युत्तर दिले हाेते.
कार्यकर्ता मेळाव्यासाठी मंगळवारी पंढरपूरमध्ये अालेले तटकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ‘आपण जर ठरविले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर आले असते,’ या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना तटकरे म्हणाले, ‘२०१४ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी चव्हाणांनी एक वक्तव्य केले होते की ‘मी जर कारवाई केली असती तर तीन माजी मुख्यमंत्र्यावर कारवाई करावी लागली असती.’ चव्हाणांनी तसे केले असते तर काँग्रेस पक्ष संपला असता कदाचित पुन्हा एकदा त्यांना यामधून तेच सुचित करावयाचे असेल,’ असा टोलाही तटकरेंनी लगावला.

‘पाटबंधारे विभागाच्या साध्या ज्युनिअर इंजिनिअरने सही केलेल्या फाईलवर डायरेक्ट पाटबंधारे मंत्री सही करीत होते,’ या चव्हाणांच्या अाराेपावर तटकरे म्हणाले, ‘असे कुठल्या प्रकराणात झाले, कुठे झाले असले तर चव्हाणांनी ते दाखवून द्यावे. चव्हाणांचे हे अाराेप म्हणजे एडीडीपीच्या सहीनंतर थेट नगरविकास खात्याच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी सही केल्यासारखे आहे.

अाबांच्या निर्णयावर माैन
‘माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस मंत्र्यांची चाैकशी लावली हाेती,’ या चव्हाणांच्या अाराेपावर तटकरे म्हणाले, ‘सध्या भुजबळांबरोबरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझीदेखील चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये सत्य बाहेर यावे यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. त्यामुळे चौकशी चालू असताना या संदर्भात भाष्य करता येणार नाही.’
बातम्या आणखी आहेत...