आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हॉन ऑरगॅनिक्सला उत्पादन बंदची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - इफेड्रीनचा१८ हजार किलोंचा साठा सापडल्याने चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील एव्हॉन ऑरगॅनिक्स कंपनी पोलिसांनी सील केली. औषध प्रशासनाने सुरू केलेल्या तपासणीमध्ये कंपनीचे संचालक व्यवस्थापनास कंपनीचे उत्पादन थांबवण्याची नोटीस दिली आहे. कंपनीच्या सर्व रेकॉर्डची तपासणी करीत आहे, तपासणीमध्ये अनेक गंभीर अनियमित बाबी समोर आल्या आहेत. कंपनीचे संचालक संबंधितांवर अधिकाधिक कडक कारवाई होईल, असे औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त एम. एस. जवंजाळ यांनी सांगितले.

इफेड्रीनचा साठा आढळल्याने एव्हॉन ऑरगॅनिक्स कंपनीच्या सर्व व्यवहारांची पोलिस अौषध प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे. औषध प्रशासनाने गेले तीन दिवस विशेष पथकामार्फत चौकशी केली जात आहे. कंपनीचा परवाना रद्द करायचा की नाही? याबाबत औषध प्रशासनाचे अायुक्त निर्णय घेतील, सध्या तरी कंपनीला उत्पादन थांबवण्याची नोटीस बजावली आहे. चौकशी पूर्ण होताच सर्व बाबी स्पष्ट होणार असल्याचे जवंजाळ यांनी स्पष्ट केले.