आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहारदार काव्य मैफलीत साकारले शिंदेंचे ‘सुशील’ चित्र अाणि शिल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मी आजवर वाढदिवस साजरा केला नाही, म्हणून आज थोडं अवघडल्यासारखं वाटतंय. आम्ही गरिबीत वाढलेली माणसं, हा प्रकार माहितीच नव्हता. पण घेतलेले कष्ट, झालेले अपमान यातून शिकत गेलो. प्रयत्न सोडले नाहीत आणि मोठा झालो, आजच्या तरुणाईनेही ते सोडू नयेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
(कै.) डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान आयोजित माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी काव्य, शिल्प चित्र महोत्सवाचा अनोखा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामदास फुटाणे, फ. मु. िशंदे, अरुण म्हात्रे, सुरेश शिंदे, भरत दौंडकर, अविनाश बनसोडे अादी नामवंत कवींनी विविध कविता सादर केल्या तर या सादरीकरणादरम्यान शिल्पकार भगवान रामपुरे चित्रकार राम खरटमल यांनी अनुक्रमे शिंदे यांचे शिल्प पोर्ट्रेट साकारले.

श्री. शिंदे म्हणाले, की हाफ चड्डी ते फुलपँट हा प्रवास सोलापूरकरांनी पाहिला आहे. माझी कर्मभूमी सोलापूर आहे. परिश्रमाने यश साध्य होते. मी इतक्या मोठ्या पदापर्यंत गेलो हे आजही मला खरे वाटत नाही. पण तरुणांना एक सल्ला आहे की, सतत कष्ट करा. मानापमान, पराभव, टीकाटिप्पणी होत असतात, त्याची चिंता करू नका. अलीकडे दबलेल्या समाजातील मंडळी पुढे येत आहेत. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी साहित्यिक ल. सि. जाधव यांना साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. दत्ता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दीड तासाच्या मैफलीत सुंदर शिल्प चित्र साकारले. यावेळी सौ. उज्ज्वला िशंदे, अामदार प्रणिती िशंदे, महापौर सुशीला अाबुटे, माजी खासदार धर्मण्णा सादूल, बाबूराव मैंदर्गीकर, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

गीते आणि कवितांना रसिकांची दाद
फ. मु. शिंदेंनी तिच्या स्पर्शाने तरुण झाला, काठाकाठांने का होईना समुद्र फिरून आला, अरुण म्हात्रे यांनी शुभ्र फुले माळून आल्या निळ्या निळ्या लाटा, दे मजला जगण्याचे बळ, छातीत फुले फुलण्याची आदी गीते कविता सादर केल्या. तुकाराम धांडे यांनी रान कविता, साईबा तुकोबा आणि आजोबा, भरत दौंडकरांनी गुंठा गुंठा जमीन विकून स्वप्नांचे खून, शिवाजी सातपुतेंनी बाई म्हणाल्या एवढ्याशा पगारात भागत नाही, इंद्रजित घुलेंनी लग्नातलं जेवणे, फुटाणेंनी किस किस की किस्मत में, सुरेश शिंदंेनी शिक्षक सालाे साल पेरलं तळे आण पाणी, अविनाश बनसोडेंनी बा स्वातंत्र्या आदींचे सादरीकरण केले. काव्यासह शिल्प आणि चित्र साकारले जात होते.

केवळ शब्दांच्या कोट्याच
शिंदेंनी कार्यक्रमाच्या सुरवातीलाच मोठी अवघडणारी खुर्ची नको असे म्हटले. हशा तर पिकलाच पण यावर फुटाणे यांनी बसा साहेब ही वाढदिवसाची खुर्ची आहे, अशी कोटी केली. शिंदेंनी प्रणिती यांना संबोधत एका लोकप्रतिनिधीने कार्यक्रमास या असे सांगितले म्हणून आलो, असे सांगितले. यावर प्रणितींनी एका मुलीने वडिलांना आमंत्रण दिल्याचे सभागृहात बसूनच जोरात सांगितले.
फडकुले सभागृहात सोमवारी सायंकाळी रंगलेल्या काव्य मैफलीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी शिल्प तर राम खरटमल यांनी चित्र रेखाटले . काव्य, शिल्प आणि चित्र या अभिनव कलेचा संगम पाहताना उपस्थित भारावून गेले.
बातम्या आणखी आहेत...