आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: ‘सकल मराठा’ने गाजर वाटप करून मुख्यमंत्र्यांचा केला निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आरक्षणाचे गाजर दाखवल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी मंगळवारी सोलापुरात मुख्यमंत्र्यांना गाजर दाखवून प्रतिकात्मक निषेध केला. महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी साेलापूरला आले होते. त्यांची सभा सुरू झाल्यानंतर आंदोलकांनी चार हुतात्मा चौकात गाजर वाटप केले. 

नांदेड येथील प्रचार सभेत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. त्या वेळी फडणवीस यांनी त्यांची खिल्ली उडवल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. ही मंडळी फोटोसाठी येतात. त्यांच्याकडे कॅमेरे फिरवा आणि पाठवून द्या, असे फडणवीस यांनी म्हटले होते. यामुळे महाराष्ट्रात ३४ टक्के असणाऱ्या समाजाची अवहेलना झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या वेळी रवी मोहिते, विजय पोखरकर, दत्ता मुळे, सोमनाथ राऊत, अक्षय जाधव, मनोज गरड, भाऊसाहेब रोडगे आदी उपस्थित होते. 

मतदानाच्या वेळी गाजर दाखवण्यासाठी आंदोलन 
लाखोंच्यासंख्येनेरस्त्यावर येऊनही कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही. जगभरात त्याची दखल घेण्यात आली. अशी आंदोलने केवळ फोटोसेशनसाठी झाल्याचे मुख्यमंत्री बोलले. हा समाजाचा अपमान आहे. मतदानात त्यांच्या पक्षाला गाजर दाखवण्यासाठीच हे आंदाेलन होते.
- माउली पवार, आंदोलक 
 
 
बातम्या आणखी आहेत...