आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारासाठी शहरात दररोज अडीच कोटींचा होतोय चुराडा, असा होतो प्रचारासाठी खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. शेवटचे पाच - सहा दिवसच आहेत. ‘होऊ द्या खर्च’ म्हणत स्पर्धक उमेदवारांशी प्रचाराची स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या वरवरच्या खर्चाचा हिशेब केला तरी प्रचारासाठी रोज शहरामध्ये सुमारे अडीच कोटी रुपयांचा चुराडा सुरू असल्याचे दिसत आहे.
 
निवडणूक आयोगाने प्रचारासाठी वस्तुनिहाय खर्च किती करावयाचा आहे, हे विस्तृतपणे स्पष्टपणे केले आहे. हा सरकारी खर्च आणि प्रत्यक्षात बाजारातील चित्र यात मोठी तफावत आहे. आयोगाने ठरवलेल्या दरापेक्षा प्रत्यक्षातील दर अनेक पटीने अधिक आहेत. संपूर्ण निवडणूक कालावधीसाठी एका उमेदवारास सहा लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. प्रत्यक्षात आढावा घेतला असता रोज एका उमेदवाराचा प्रचारावर होणारा खर्च किमान ४१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. २६ प्रभागांतील सुमारे ६०० उमेदवार प्रचारावर एका दिवसाला दोन कोटी ६० लाख रुपये खर्च करत आहेत. हा खर्च केवळ पदयात्रा, रिक्षा, कॉर्नर सभा चहा, नाष्टा, जेवण आदी वरवर दिसणाऱ्या बाबींवरील आहे. 
 
कि.मी. चाला ३०० रुपये देऊ... 
प्रचारासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून सकाळी सायंकाळी पदयात्रा, होम टू होम प्रचारावर भर दिला जात आहे. यामध्ये काही प्रभागांमध्ये पदयात्रेसाठी कार्यकर्ते मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर उमेदवारांनी किलोमीटर चाला ३०० रुपये देऊ असे पॅकेज समोर आणले आहे. पूर्वभागातील एका वृद्ध महिलेला विचारले असता, प्रभाग मोठा झालाय, चालणे होत नाही. शिवाय ३०० रुपये परवडत नाही असे तिने सांगितले. 

राजकीय सभा - प्रमुख नेत्यांची सभा असल्यास उमेदवारांना दुप्पट खर्च करावा लागत आहे. सभा पदयात्रा या दोन्ही कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. पदयात्रा सभेसाठी
वेगवेगळा दर पेड कार्यकर्त्यांना द्यावा लागत आहे. 
 
पदयात्रा - एका प्रभागात किमान रोज दोन पदयात्रा काढण्यात येत आहेत. यामध्ये २०० ते ३०० कार्यकर्त्यांचा समावेश असतो. त्यासाठी साधारणपणे २०० कार्यकर्ते हे रोजंदारीवर आणले जात आहेत. महिला कार्यकर्त्यांना ३०० रुपये तर पुरुष कार्यकर्त्यास ५०० रुपये मजुरी दिली जात आहे. शिवाय त्यांचा नाश्ता, जेवण याचा खर्च वेगळा आहे. १०० कार्यकर्ते गृहित धरल्यास एका दिवशी पदयात्रेचे ३० हजार रुपये झाले. त्यांच्या नाश्ता जेवण यावर १० हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. 

प्रचार साहित्य - प्रचार साहित्यावरही मोठा खर्च करावा लागत आहे. प्रभागामध्ये पदयात्रा, होम टू होम प्रचार करताना उमेदवारांनी प्रभागातील विकासकामे याची माहितीपुस्तिका काढली आहे. यामध्येही प्रमुख पक्षांनी गुळगुळीत कागद वापरला आहे तर अपक्ष उमेदवारांनी साध्या कागदाचा वापर केला आहे. याशिवाय पक्ष चिन्ह असलेले बॅचेस, झेंडे, दुपट्टा, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या यावर एका पक्षाला ते १० हजार रुपये खर्च करावा लागत आहे. 

रिक्षा - प्रचाराच्या एका रिक्षासाठी १५०० रुपये खर्च आहे. यामध्ये दोन स्पीकर, रिक्षावरील बॅनर, रिक्षाचे इंधन यासह भाडे याचा समावेश आहे. एका रिक्षाला प्रचार करण्यासाठी प्रभागातील ठरावीक परिसर नेमून दिला जातो. सकाळी, दुपारी सायंकाळी या वेळेत प्रचार करण्याच्या सूचना उमेदवारांकडून दिल्या आहेत. 

तुम्ही जे मागाल, ते मिळेल... 
प्रचाराचानवीन फंडा म्हणून उमेदवारांकडून नवनवीन कल्पना राबवल्या जात आहेत. महिला आणि लहान मुलांना आकर्षक वस्तू भेट म्हणून दिल्या जात आहेत. तर काही उमेदवार थेट विविदा समाजाचे प्रमुख वा अपार्टमेंटच्या अध्यक्षांना आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवले जात आहे. काही समाजघटकांना मागेल ती मदत दिली जात आहे. काही भागातील कॉलनीमध्ये रस्ते, ड्रेनेज, नळांची दुरुस्ती काही ठिकाणी समाजमंदिराचे बांधकामही करून देण्यात येत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...