आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंद नसलेल्या १७ हजार मिळकती, तीन पेठा सोडून सर्व पेठांची झाली पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेकडे नोंद नसलेल्या सुमारे १७ हजार मिळकती आढळून आल्या आहेत. सायबर टेक कंपनीने ‘जीआयएस’ (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सर्व्हिस) प्रणालीने पाहणी करण्यात आली. शहरातील ५२ पैकी ४९ पेठांतील सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले. बुधवार पेठ, विडी घरकुलसह काही पेठांचे काम अपूर्ण आहे. यातील ३४ हजार ४८८ इमारतींमधील मिळकतीचा शोध घेणे बाकी आहे, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. 
 
एकूण ७९ हजार ७३ इमारती आहेत. त्यात एक लाख ८२ हजार ७७२ मिळकती मिळून आल्या. तर ३४ हजार ४८८ इमारतीमधील मिळकतींची गणना करणे राहिले आहे. याशिवाय झोपडट्ट्यांची गणना अद्याप झाली नाही. महापालिकेने केलेल्या सर्व्हेत आतापर्यंत नोंद नसलेल्या १७ हजार २५९ मिळकती मिळून आल्या. त्यामुळे या सर्व्हेत अपेक्षेप्रमाणे मिळकती मिळण्याची शक्यता कमी आहे. 

शहरातील सर्व मिळकतींची नोंद मनपाकडे नसल्याचे आढळल्याने शोध घेण्यासाठी महापालिकेने सर्व्हे सुरू केला. त्यासाठी पाच कोटींचा मक्ता दिला. मागील तीन वर्षांपासून सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने तत्काळ काम पूर्ण करा, असे महापालिका सभागृहात वारंवार सांगण्यात आले. 

झोपडपट्ट्यांची गणना नाही 
महपालिकेने केलेल्या सर्व्हेत शहरातील अधिकृत आणि अनधिकृत झोपडपट्ट्यांचा समावेश नाही. त्यासह तीन पेठांचा सर्व्हे होणार आहे. 

{एकूण इमारती : ७९ हजार ७३ 
{जीआयएस सर्व्हेत इमारती : ६९ हजार १३८ 
{मनपाकडे नोंद मिळकती : एक लाख ९९ हजार ९९९ 
{सर्व्हेतील मिळकती : एक लाख ८२ हजार ७७२ 
{न मिळालेल्या इमारती : २३ हजार १५४ 
{सर्व्हे शिल्लक इमारती : ३४ हजार ४८८ 
{सार्वजनिक नळ सोसायट्यांसह : ६१ हजार ३९० 
{वैयक्तिक नळ : ७६ हजार ४९२ 

भवानी पेठेत सर्वाधिक नोंद नसलेल्या मिळकती 
भवानी पेठेत नोंद नसलेल्या सर्वाधिक मिळकती आढळल्या आहेत. तेथे सहा हजार ९२४ इमारतींची नोंद आहे. प्रत्यक्षात २२ इमारती जास्त मिळून आल्या. महापालिकेकडे नोंद मात्र सहा हजार ८८४ आहे. प्रत्यक्षात मोजणी केल्यानंतर ११ हजार ९५८ इतके मिळकती मिळून आल्या. त्यापैकी नोंद नसलेल्या तीन हजार ३२३ मिळकती मिळून आल्या. याशिवाय २४५ इमारतीमधील मिळकती शोधणे अाहे. 

सुमारे ४० हजार मिळकती मिळतील 
सुमारे ४० हजार मिळकती नोंद नसलेल्या मिळून येतील, असा अंदाज आहे. सोरेगाव येथील सर्वाधिक तीन हजार ९९८ मिळकतींची मोजणी केलेली नाही. 
बातम्या आणखी आहेत...