आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रॉपर्टी- ऑटो एक्स्पो-१६ ला सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - व्यक्तींच्याजीवनामध्ये घर, गाडी या गोष्टींना महत्त्वाचे स्थान असून त्या मिळण्यासाठी व्यक्ती आयुष्याची पुंजी लावत असतो. त्या योग्य किमतीमध्ये मिळणे ही माफक अपेक्षा ग्राहकांची असते. ग्राहकांच्या मागणी पसंतीला उतरत ‘दिव्य मराठी’च्या वतीने वाहन, गृह या गोष्टी एकाच छताखाली आणल्या आहेत. तसेच कर्जदेखील माफक दरात मिळावे यासाठी काही बँकांनी सहभाग नोंदविला होता. रविवार हा सुटीच्या दिवस असल्याने प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद देत होम मैदानावर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
‘दिव्य मराठी’ अाणि अारएनए इव्हेंट्सतर्फे भार्गवी ग्रुप प्रस्तुत प्रॉपर्टी-ऑटो एक्स्पो-१६ या गृह अाणि वाहन प्रदर्शनाचा रविवार हा दुसरा दिवस आहे. यामध्ये विविध प्रकारची वाहने, गृह प्रकल्प, बँक लोन, मोटारसायकल आदींची ४४ दालने खुली करण्यात आली आहेत. उर्वरितपान
गेल्याकाही दिवसांपासून राज्य सरकारनेही आठवडी बाजारची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. गृह वाहन प्रदर्शनातून सोलापूरकरांना एकाच छताखाली गृह वाहनांसंबंधी आवश्यक असणारी माहिती मिळणार आहे. त्यामुळे अशा उपक्रमांची आज शहराला गरज आहे.

प्रॉपर्टी अॅटो एक्स्पोचा चा समारोप १२ रोजी सायं. वा. आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षेखाली होणार आहे. यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुनिल फुरडे,भार्गवी ग्रुपचे अमोल यादव , एसीसीई अध्यक्ष इप्तेखार नदाफ , एसएडीएचे संचालक दिपक पाटील, संचालक नितीन बिज्जरगी उपस्थित राहतील.

^‘दिव्य मराठी’तर्फेभरविण्यात आलेल्या प्रदर्शन ग्राहकांसाठी पर्वणी ठरणारे आहे. दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तावर नक्कीच बुकिंग होण्यास मदत होईल. आमच्या दालनास ३०० हून अधिक लोकांनी भेट दिली आहे. त्यांचे रेकॉर्ड तयार केले आहे. या प्रदर्शनाचा लोकांचे मन सेट करण्यासाठी लाभ होईल. त्यामुळे दिवाळीला प्लॉटची नक्कीच खरेदी होईल. काही ग्राहकांनी दिवाळी दसऱ्याला खरेदी करणार असल्याचे सांगितले.” अमोलयादव, भार्गवी ग्रुप

^गृह वाहनप्रदर्शनास शहरवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गृह वाहनांचे बुकिंग केले तर काहींनी प्रत्यक्षात डिलिव्हरी केली आहे. प्रदर्शन पाहणी झाल्यानंतर खमंग खाद्य पदार्थांचे दालन खवय्यांसाठी उपलब्ध केले होते. सुटीचा दिवस असल्याने ‘दिव्य मराठी’च्या वाचकांनी खूप गर्दी केली होती.” राहीहोमकर- आरशिद, व्यवस्थापक, आरएनए इव्हेन्ट्स
बातम्या आणखी आहेत...