आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्मार्ट शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरवासीयांची घरांची गरज पूर्ण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला प्रॉपर्टी एक्स्पो हा सोलापूरकरांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. माणसांच्या अनेक गरजांपैकी घर ही एक गरज आहे. नवनवीन तंत्रज्ञान सर्व सुविधांनी युक्त अशी घरे या प्रदर्शनातून सोलापूरकरांना मिळतील. स्मार्ट सोलापूरकरांच्या सौंर्दयात भर टाकणारा हा प्राॅपर्टी एक्सपो असल्याचे प्रतिपादन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.
बांधकामासंबंधी काढलेल्या सामंजस्य पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, एचडीएफसी बँकेचे शरदकुमार, क्रेडाईचे अध्यक्ष समीर गांधी, माजी अध्यक्ष सुनील फुरडे, उपाध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, मार्गदर्शक राजेंद्र शाह, प्रदीप पिंपरकर, प्रियदर्शन शहा, अविनाश बचुवार, राजेश गांधी, शशिकांत जिड्डीमनी, राजीव दीपाली, अभय सुराणा, उमेश लोलगे, केदार बिराजदार, अभयकुमार एडके, मिलिंद जक्कल, सुमित कांकरिया, जयंत होळे-पाटील आदी उपस्थित होते.

श्री. काळम-पाटील यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, सोलापूरकरांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घेत घरंाचे स्वप्न साकारावे.
प्रदर्शनामध्येक्रेडाईचे सदस्य असलेले बांधकाम व्यावसायिकांना संधी दिली आहे. या छताखाली ग्राहकांना मिळणारी चांगल्या दर्जाची परवडतील अशा किमतीमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक सोलापूरकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

तयार घरे एकाच छताखाली
तीन दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनात तयार घरांचे २४ स्टॉल्स आहेत. या स्टॉल्समध्ये रो-हाऊस, वन बीएचके, टूबीएचके, लक्झरीयस घर पाहायला मिळणार आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनीही विविध योजनाही ग्राहकांसाठी आणल्या आहेत. या प्रदर्शनाचे प्रायोजक एचडीएफसी बँकेने घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...