आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहनचे दिवाळे: बुधवार पेठेतील जागा विक्रीचा आला प्रस्ताव; कोट्यवधीच्या जमिनीवर डोळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका परिवहन विभागाचे दिवाळेच निघाल्याचे एकूण चित्र समोर अाले अाहे. मंगळवारी झालेल्या सभेत बुधवार पेठेतील साडेचार एकर जमीन चक्क विक्रीला काढण्याचा प्रस्ताव सदस्य संतोष कदम आणि विजय पुकाळे यांनी मांडला. शिवाय सात रस्ता येथील डेपोची जागा ‘बीओटी’ (बांधा, वापरा आणि हस्तांतर करा) या तत्त्वावर देण्याची मागणी पुढे केली. अश्विनी रुग्णालयाजवळील जागेवर पंप आणि पूरक व्यवसाय करण्याचा प्रस्ताव दिला. 

महापालिका परिवहन विभागाचे एवढे दिवाळे निघालेले असतानाही सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी पुढे करण्यात आली आहे. दोनऐवजी चार हजार रुपये मानधन पाहिजे, हा विषयही सभेच्या पटलावर आला आहे. त्यामुळे या महापालिकेच्या परिवहनचे पुढे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

एकीकडे कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांपासून वेतन नाही. त्यावरून महापालिका आयुक्त आणि परिवहन कामगार यांच्यात संघर्ष सुरू झाला. या पार्श्वभूमीवर थेट जागा विक्रीचा प्रस्ताव आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वस्तुत: बुधवार पेठेतील जागेत उत्पन्न वाढीचे उपाय करता येतील. पण विकण्याचा घाटच समिती सदस्याकडून रचला गेला अाहे. सध्या या जागेवर कामकाज नाही. त्यामुळे अतिक्रमण वाढले. त्यामुळे तेथील जागा विकून कामगारांची देणी देण्याचे सूचित करण्यात येत आहे. परिवहनचा विकास आराखड्यात ही बाब नमूद करण्यात आली. 

मानधन वाढीसह एकूण १२ प्रस्ताव 
परिवहन समिती सदस्यांना दोन हजार रुपये मानधन मिळते. प्रती सभा भत्ता १०० रुपये दिला जातो. मानधन चार हजार रुपये करावे, असा प्रस्ताव आहे. गुरुवारी होणाऱ्या परिवहन समितीपुढे १२ प्रस्ताव असून त्यापैकी ११ प्रस्ताव शिवसेनेचे संतोष कदम आणि विजय पुकाळे यांनी दिले आहेत.
 
अन्य प्रस्ताव असे 
- बस थांबाच्या जाहिरातींचा मक्ता संजय नीट यांचे असून ते रद्द करणे. 
- सीसीटीव्ही बसवणे कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक्स पद्धतीने करणे. 
- तिकिटासाठी इटीएम मशीन बसवणे, व्यवस्थापक नेमणूक करणे 
- मुख्य वाहतूक निरीक्षक एन. जे. हुल्ले यांच्यावर कारवाई करणे. 
- मनपास बंद केलेल्या डिझेल पुरवठ्याबाबत तातडीने निर्णय घेणे. 

प्रशासन काही करत नाही म्हणून प्रस्ताव 
प्रशासनाला उत्पन्नवाढीचे अनेक उपाय सुचवले. त्याचा काहीच उपयोग हाेत नाही म्हणून आम्हीच सविस्तर प्रस्ताव दिला. बुधवार पेठेतील जागा शासनाने घेऊन तेथे पंतप्रधान आवास योजना साकारावी. त्याची रक्कम परिवहनला द्यावी.
- दैदिप्य वडापूरकर, मनपा परिवहन सभापती 
बातम्या आणखी आहेत...