आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र समाजकार्य विद्यापीठाच्या राज्य सरकारकडून हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - समाजकार्य महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारणीच्या हालचाली आहेत. याच्या निर्मितीसाठी कायद्याचे प्रारूप तयार करण्यात येत आहे. त्याच्या समितीच्या सदस्यपदी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव शिवशरण माळी यांची निवड झाली आहे.

राज्यात विविध जिल्ह्यात सध्या ६० महाविद्यालयांतून समाजकार्य अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज समाजकल्याण विभागाद्वारे होते. मात्र संलग्नता त्या त्या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात देण्यात आलेली असते. यासाठी समाजकार्य अभ्यासक्रमांची स्वतंत्र महाविद्यालये आता या समाजकार्य विद्यापीठाला संलग्नित करण्याच्या दृष्टीने कायदेशीर बाबी, विविध सूचना, विचारात घेतल्या जात आहेत.
समितीची बैठक २९ ३० ऑक्टोबरला नागपूर येथे रविभवन सभागृहात झाली. सोलापूर विद्यापीठाला संलग्नित वालचंद समाजकार्य चंदेले समाजकार्य ही महाविद्यालये आहेत.
समाज कार्य अभ्यासक्रम चालविणारी बहुसंख्य महाविद्यालये नागपूर विभागात असल्याने प्रस्तावित समाजकार्य विद्यापीठ नागपूर येथे होण्याची शक्यता आहे. शिवशरण माळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ