आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओच्या शुल्कवाढीचा निषेध, मोटार मालक संघटनेचे आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) प्रशासनाने जवळपास २४ प्रकारच्या सेवा शुल्कात ते ३० टक्के दरवाढ केली. ही वाढ सर्व सामान्यांना परवडणारी नाही. नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्व सामान्य माणूस आधीच भरडला गेला आहे. यात शुल्कवाढ अन्यायकारक असल्याची भावना सोलापूर मोटार मालक संघटना मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने व्यक्त केली. 

निर्णयाच्या विरोधात बुधवारी दुपारी संघटनांनी आंदोलन केले. तसेच तीन दिवस काम बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर आरटीओ कार्यालयात शुकशुकाट होता. काही व्यक्तींनी विना एजंट कार्यालयात येऊन आपली कामे करून घेतली. रोज सरासरी ३०० ते ३२५ वाहन परवाने वितरित होतात. बुधवारी मात्र अवघे ४० ते ५० परवाने दिले गेले. अन्य कामे करण्याकडे देखील नागरिकांनी पाठ फिरवली. लर्निंग लायसन्सचे शुल्क ३१ वरून १५१ रुपये केले. अन्य शुल्कात मोठी वाढ करण्यात आली. या वेळी सलीम शेख, राजशेखर कंदलगावकर, भाऊ मागाडे आदी उपस्थित होते. आंदोलनानंतर आरटीओ िजल्हाधिकारी यांना निवेदनाची प्रत देण्यात आली. 

दिवसकाम बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर आरटीओ कार्यालयात शुकशुकाट होता. काही व्यक्तींनी विना एजंट कार्यालयात येऊन आपली कामे करून घेतली. रोज सरासरी ३०० ते ३२५ वाहन परवाने वितरित होतात. बुधवारी मात्र अवघे ४० ते ५० परवाने दिले गेले. अन्य कामे करण्याकडे देखील नागरिकांनी पाठ फिरवली. लर्निंग लायसन्सचे शुल्क ३१ वरून १५१ रुपये केले. अन्य शुल्कात मोठी वाढ करण्यात आली. 
 
बातम्या आणखी आहेत...