आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार परिचारकांच्या निषेधार्थ करमाळा बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा - स्वतःच्या बायकोसाठी नाही तर देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांबाबत बेताल विधान करणे म्हणजे देशाच्या विरोधात बोलणे अाहे, अशा व्यक्तीस शिक्षा दिली नाही तर पुढेही अशीच देशद्रोही वक्तव्य होत राहतील. त्यामुळे प्रशांत परिचारकांची आमदारकी रद्द करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करमाळ्यात मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. 
 
याबाबत नायब तहसीलदार शांताराम किरवे यांना निवेदन देण्यात आले. प्रशांत परिचारकांनी भरसभेत सैनिक कुटुंबांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्त्यव्याचा निषेध गुरुवारी करमाळा बंद गावातून निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील व्यापारी आडत कामगारांनीही आजी, माजी सैनिकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी १०० टक्के दुकाने बंद ठेवली होती. जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले, उषा चव्हाण, सैनिक पत्नी माता आशा मोरे, विवेक येवले, नितीन आढाव, महेंद्र पाटील, नितीन दामोदरे, बाळासाहेब सुर्वे, सिध्दार्थ वाघमारे, नितीन खटके, शहाजी देशमुख, महेश चिवटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सकाळी नऊ वाजता पोथरे नाका, करमाळा येथून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. सकाळपासूनच व्यापारी आणि दुकानचालकांनी दुकाने बंदच ठेवून बंदला प्रतिसाद दिला. महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात केली. भवानी पेठ छत्रपती चौक ते राशीन पेठ येथून मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. त्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर आजी, माजी सैनिक सहभागी झाले होते. महिलांचीही उपस्थित होती. तालुक्यातून नागरिकांनी हजेरी लावली होती. राशीन पेठ भागात आल्यानंतर परिचारकांच्या प्रतिकृतीला चपलांचा हार घालण्यात आला. प्रतिमेला महिलांनी चपलीचा मारही दिला. त्यानंतर त्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. 
 
यावेळी आजी, माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष जोतिराम तोबरे, उपाध्यक्ष रामहारी वायकुळे, बाजीराव खरात, मोहन जगताप, रावसाहेब शिंदे, ज्ञानदेव जगताप, मारुती बनसोडे, विठ्ठल राऊत, गोरख देशमुख, अशोक यादव, भाऊसाहेब शिंदे, प्रकाश पाटील, अनिल साखरे, गौतम सोनवणे, फुलचंद मिसाळ आजी, माजी सैनिक विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सैनिक पत्नींच्या चारित्र्याबाबत वक्तव्य केल्याने सगळीकडे संतापाची लाट अाहे. 
 
चुंगीतही झाला निषेध 
अक्कलकोटतालुक्यातील चुंगी येथेही आमदार प्रशांत परिचारक यांचा निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी बिग्रेडचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद काजळे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष गोविंद मोरे, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन भीम जोगदे, कैलास चव्हाण, हरिदास माने, व्यंकट काजळे, स्वामिनाथ कलकोटे, मल्लू वर्दे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...