आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ नामांतर मोर्चात लाखभर सहभागी होतील, सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्यासाठी १८ सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून एक लाख लोक त्यात सामील होतील, अशी माहिती शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
सकाळी ११ वाजता महात्मा बसवेश्वर सर्कल येथून मोर्चास प्रारंभ होईल. तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ, अशी भ्रामक आशा दाखवून ही अफूची गोळी त्यांना देण्यात येत असल्याचे प्रा. धोंडे म्हणाले. 
 
काडादी म्हणाले की, आम्ही राजकारण विरहीत काम करीत आहोत. काही लाेक जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. चार ठिकाणी वाहनतळ केले आहे. यात होम मैदान, रंगभवन चौकातील ईदगाह मैदान, जुनी मिल कंपाऊंड, संगमेश्वर कॉलेजचे मैदान यांचा समावेश अाहे. आतापर्यंत १६ संघटना संस्थांनी पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषदेस नंदीध्वज मानकरी राजशेखर हिरेहब्बू, देवस्थान पंच कमिटी सदस्य आदी उपस्थित होते. 
 
वीरशैव व्हीजनचा पाठिंबा 
सिध्देश्वरविद्यापीठ नामांतर मोर्चाला वीरशैव व्हीजनने पाठिंबा दिला आहे. त्याचे पत्र सिध्देश्वर देवस्थान देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांना देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता हुल्ले नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, कुमार शिरसी, अप्पासाहेब पसारगे, विजय बिराजदार , प्रा. संगमेश्वर नीला, आदी उपस्थित होते. 
 
लक्ष्मी मार्केट व्यापारी संघाकडून पाठिंबा 
लक्ष्मी मार्केटमधील मुस्लिम व्यापारी बांधवांनी मोर्चास पाठिंबा दिल्याचे पत्र अध्यक्ष रियाज बागवान नसीर अहमद खलिफा यांनी धोंडे यांना दिले आहे. तसेच बाजार समितीतील आठ संघटनांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यावेळी सिद्धय्या स्वामी हिरेमठ, शिवयोग शास्त्री होळीमठ उपस्थित होते.
 
बातम्या आणखी आहेत...